सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीचा भूमिकेसाठी रणवीर सिंगने बनवली होती स्पेशल प्ले लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 16:37 IST2017-10-05T11:07:36+5:302017-10-05T16:37:36+5:30

संजय लीला भन्साळी यांच्या महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट पैकी एक पद्मावती मानला जातो. यातील सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीचा भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंगने ...

Ranvir Singh made special play list for Sultan Alauddin Khilji's role | सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीचा भूमिकेसाठी रणवीर सिंगने बनवली होती स्पेशल प्ले लिस्ट

सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीचा भूमिकेसाठी रणवीर सिंगने बनवली होती स्पेशल प्ले लिस्ट

>संजय लीला भन्साळी यांच्या महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट पैकी एक पद्मावती मानला जातो. यातील सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीचा भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंगने अनेक नवे प्रयोग केले आहेत. रणवीरने ही भूमिका साकारण्याच्या आधी तयारीसाठी आपली एक वेगळी प्ले-लिस्ट तयाप केली होती. ही प्ले-लिस्ट नेहमी तो शूटिंग सुरु करण्याच्या आधी ऐकायचा. रणवीरचा स्पॉटबॉय हातात स्पिकर घेऊन त्याला गाणे ऐकायला मदत करायचे. रणवीर घरातून निघाल्यावर गाडीमध्ये असताना, सेटवर आल्यावर मेकअप करताना आणि अगदी शॉर्ट रेडी घेऊपर्यंत तो सतत गाणी ऐकायचा.   
 
संजय लीला भन्साळी आणि रणवीर सिंग एकमेकांशी नेहमी संगीतावर गप्पा मारायचे. रणवीरकडे गाण्याचे खूप चांगले कलेक्शन आहे. रणवीरला शाळेत असल्यापासून चांगले संगीत ऐकण्याची आवड आहे. रणवीरला सगळ्या प्रकारची संगीत ऐकायला आवडते. मात्र पद्मावतीमधील भूमिका साकारताना त्यांने आपली वेगळी एक प्ले लिस्ट तयार केली होती.  ज्यामुळे त्याला त्याची भूमिका समजायला मदत होईल. नसरत फत्ते अली खान, जॉन विलियम्स, हंस जिमर, जंका एक्सएल, रामिन जावदी आणि जेम्स न्यूटन हावर्ड यांची गाणी तो ऐकायचा.  

ALSO RAED :  नाराज आहे ‘पद्मावती’ची अख्खी टीम...रणवीर सिंग सुद्धा रागात! वाचा काय आहे कारण!!
 
रणवीर सिंग सांगतो, ''माझे असे मानणे आहे की संगीत तुम्हाला एखाद्या गोष्टी मागील भावना समजून घ्यायला चांगल्या पद्धतीने मदत करते. संगीताबाबत मी जास्त संवेदनशील आहे. संगीत मला माझी भावना व्यक्त करण्यासाठी प्रेरणा देत.'' अलाऊद्दीनची भूमिका साकारताना रणवीरने भूमिकेत शिरण्यासाठी अनेक दिवस स्वत:ला घरात कोंडून घेतले होते. खिल्जीच्या व्यक्तिरेखेत रणवीर असा काही शिरला की, त्याची चालण्या-बोलण्याची ढबही बदलली. या चित्रपटातील रणवीरचा लूक रिव्हिल करण्यात आला आहे. याआधी राणी पद्मावती अर्थात दीपिका पादुकोण आणि राणी पद्मावतीचे पती महारावल रतन सिंगच्या भूमिकेत शाहिद कपूरचा लूकसमोर आला आहे. हा चित्रपट आधी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार होता मात्र आता तो 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  हा चित्रपटाच्या रिलीजची वाट त्यांचे फॅन्स आतुरतेने बघत असतील. 

Web Title: Ranvir Singh made special play list for Sultan Alauddin Khilji's role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.