​ रणवीर व दीपिकाने का सोडले आपआपले घर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 12:19 IST2016-12-16T12:19:30+5:302016-12-16T12:19:30+5:30

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये बिझी असलेले रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या दोघांनीही आपआपले घर सोडून  हॉटेलात मुक्काम हलवला ...

Ranvir and Deepika have left your house? | ​ रणवीर व दीपिकाने का सोडले आपआपले घर?

​ रणवीर व दीपिकाने का सोडले आपआपले घर?

जय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये बिझी असलेले रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या दोघांनीही आपआपले घर सोडून  हॉटेलात मुक्काम हलवला आहे. होय, दीपिका आता मुंबईतील तिच्या प्रभादेवी अपार्टमेंटमध्ये राहत नसून गोरेगावच्या एका मोठ्या हॉटेलात मुक्कामाला आहे. तर रणवीरनेही दीपिकाच्या या हॉटेलशेजारी बस्तान हलवले आहे. अर्थात तुमच्या मनात वेगवेगळे विचार येण्याआधी आम्ही यामागचे कारण सांगतोय. राहते घर सोडून वेगळीकडे मुक्काम हलवण्याचा रणवीर व दीपिकाचा हा सर्व खटाटोप दुसºय कशासाठी नसून भन्साळींच्या ‘पद्मावती’साठी आहे. होय, दीपिका व रणवीर हे दोघेही ‘पद्मावती’च्या व्यक्तिरेखेतून जराही बाहेर पडू नयेत. या व्यक्तिरेखांशी जुळलेली त्यांची नाळ तशीच कायम राहावी, हा भन्साळींचा प्रयत्न आहे. जेणेकरून पडद्यावर दोघांचाही अधिकाधिक जिवंत अभिनय बघायला मिळेल.
‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यानही रणवीर व दीपिका फिल्म सिटीच्या जवळ राहायला आले होते. हाच फार्म्युला भन्साळींनी आता ‘पद्मावती’साठी वापरला आहे. कदाचित दीपिका व रणवीरच्या आॅनस्क्रीन केमिस्ट्रीमागचे रहस्य हेच असावे आणि म्हणूनच भन्साळींनी दुसºयांदा या जोडीला आपल्या चित्रपटात घेतले. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दीपिकाचा अधिकाधिक वेळ ‘पद्मावती’च्या सेटवर जातोय. शूटींगनंतर जवळच्याच एका हॉटेलात ती मुक्कामाला आहे. रणवीरनेही गोरेगावात एक तात्पुरते घर घेतले आहे. एकंदर काय तर भन्साळींच्या फार्म्युल्यानुसार रणवीर व दीपिका दोघांनीही आपआपली व्यक्तिरेखा अगदी कोळून प्याली आहे. आता त्याचे परिणाम येत्या दिवसांत ‘पद्मावती’च्या रूपात आपल्याला दिसतीलच. मात्र तोपर्यंत प्रतीक्षाही आलीच.

Web Title: Ranvir and Deepika have left your house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.