दीपिका पादुकोणसोबतचे प्रायव्हेट फोटो डिलीट करण्यासाठी फोटोग्राफरवर धावून गेला रणवीर सिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 21:52 IST2017-09-07T16:00:15+5:302017-09-07T21:52:35+5:30

चित्रपटात जेव्हा हीरो-हिरोईन प्रेमात दंग असतात तेव्हाच एखाद्या व्हिलनची धमाकेदार एंट्री होत असते. तो या लव्हबर्डच्या प्रेमात विघ्न आणतो, ...

Ranveer Singh went to the photographer to delete the private photo of Deepika Padukone. | दीपिका पादुकोणसोबतचे प्रायव्हेट फोटो डिलीट करण्यासाठी फोटोग्राफरवर धावून गेला रणवीर सिंग!

दीपिका पादुकोणसोबतचे प्रायव्हेट फोटो डिलीट करण्यासाठी फोटोग्राफरवर धावून गेला रणवीर सिंग!

त्रपटात जेव्हा हीरो-हिरोईन प्रेमात दंग असतात तेव्हाच एखाद्या व्हिलनची धमाकेदार एंट्री होत असते. तो या लव्हबर्डच्या प्रेमात विघ्न आणतो, ज्यामुळे हीरो त्याच्याशी फाइट करून आपल्या हिरोईनला इम्प्रेस करतो. आता तुम्ही म्हणाल की हे आम्हाला माहिती आहे, नव्याने सांगण्याची काय गरज? तर आज आम्ही या सीन्सशी मिळतीजुळती रिअल लाईफ लव्हस्टोरी तुम्हाला सांगणार आहोत. कारण जो किस्सा आम्ही सांगितला असाच किस्सा बॉलिवूडमधील एक लव्हबर्डच्या बाबतीत घडला आहे. 

खरं तर इंडस्ट्रीत लव्हबर्डची काही कमी नाही. विशेष म्हणजे या लव्हबर्डची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटांच्या कथेपेक्षा कमी नाही. आज आम्ही जी लव्हस्टोरी सांगणार आहोत, त्यामध्ये फक्त एकच फरक आहे की, यामधील व्हिलन एक फोटोग्राफर आहे. होय, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणच्या लव्हस्टोरीमध्ये असा सीन घडला आहे. हा किस्सा २ फेब्रुवारी २०१४ चा आहे. ही तारीख सांगण्यामागचे कारण म्हणजे याचदिवशी अहाना देओल हिचे लग्न झाले. अहानाच्या लग्नात दीपिका आणि रणवीर आले होते. मात्र, यादरम्यान रणवीर आणि दीपिकामध्ये असे काही घडले की, ज्यामुळे अहानाच्या लग्नापेक्षा रणवीर आणि दीपिकाच्या प्रेमाचेच अधिक किस्से चर्चिले गेले. 



होय, लग्नाच्या दिवशी रणवीर चक्क एका फोटो जर्नालिस्टबरोबर वाद घालताना दिसला. त्याने या फोटोग्राफर जवळचा कॅमेरा हिसकावून घेत त्यातून दीपिकासोबतचे काही प्रायव्हेट फोटो डिलीट केले. त्याचे असे झाले होते की, अहानाच्या लग्नात आलेला रणवीर पूर्णवेळ दीपिकाच्या मागे पळताना दिसत होता. त्याने एक क्षणदेखील तिला सोडले नव्हते. कळस तर तेव्हा झाला जेव्हा तो चक्क दीपिकाच्या मागेमागे बाथरूममध्ये गेला. याचदरम्यान रणवीरने दीपिकाच्या गालावर आणि हातावर बºयाचदा किस केले. नेमके या दोघांचे हे फोटो कॅमेºयात कैद झाले. 

मात्र, जेव्हा ही बाब रणवीरच्या लक्षात आली तेव्हा तो चांगलाच बिथरला होता. रागाच्या भरात तो फोटोग्राफरच्या मागे पळत सुटला. फोटोग्राफरला पकडून त्याने ते फोटो डिलीट करण्यास सांगितले. सुरुवातीला फोटोग्राफरने त्यास नकार दिला. मात्र रणवीरचा राग बघून त्याने कॅमेराच रणवीरच्या हातात सोपविला. रणवीरने लगेचच दीपिकासोबतचे ते प्रायव्हेट फोटो डिलीट केले. पुढे तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या फोटोग्राफरला धमकीही दिली. दुसºया दिवशी हे प्रकरण वाºयासारखे पसरले होते. असो, सध्या रणवीर आणि दीपिका एकमेकांना डेट करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याची चर्चा होती, परंतु अजूनही ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचेच दिसून येते. 

Web Title: Ranveer Singh went to the photographer to delete the private photo of Deepika Padukone.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.