​रणवीर सिंग झाला जखमी अन् ‘पद्मावती’चा झाला फायदा; जाणून घ्या कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 11:10 IST2017-10-13T05:40:37+5:302017-10-13T11:10:37+5:30

रणवीर सिंग हे एक अजब मिश्रण आहे. बॉलिवूडचा सर्वाधिक एनर्जेटिक हिरो, असे रणवीरला म्हटले तरी वावगे ठरणार नाही. एखाद्या ...

Ranveer Singh was the winner of 'Padmavati'; How to know? | ​रणवीर सिंग झाला जखमी अन् ‘पद्मावती’चा झाला फायदा; जाणून घ्या कसा?

​रणवीर सिंग झाला जखमी अन् ‘पद्मावती’चा झाला फायदा; जाणून घ्या कसा?

वीर सिंग हे एक अजब मिश्रण आहे. बॉलिवूडचा सर्वाधिक एनर्जेटिक हिरो, असे रणवीरला म्हटले तरी वावगे ठरणार नाही. एखाद्या सिनेमाचा सेट असो वा कुठलासा इव्हेंट प्रत्येकठिकाणी रणवीर अगदी फ्रेश असतो. त्याचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असतो. खरे तर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्याच्या याच स्वभावावर भाळले आहेत. कदाचित त्याचमुळे रणवीरसोबत तिसरा चित्रपट घेऊन ते येत आहेत. ‘गोलियों की रासलीला : रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या दोन्ही चित्रपटात रणवीर प्रेक्षकांना भावला आणि आता ‘पद्मावती’त रणवीर एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे.  ‘पद्मावती’त रणवीर अलाऊद्दीन खिल्जीच्या निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे. त्याचा हा लूक काहीअर्थी भयावह म्हणायला हवा. पण त्याच्या या भयंकर लूकमागे एक रिअल लाईफ घटना कारणीभूत आहे, हे कदाचित तुम्हाला माहित नसेल.


 जखमी रणवीरचा फाईल फोटो

ALSO READ : Watch : ​केवळ अप्रतिम! चुकूनही पाहायला विसरू नये, असा ‘पद्मावती’चा शानदार ट्रेलर रिलीज!!

होय,  ‘पद्मावती’च्या क्लायमॅक्सचे शूटींग सुरु असताना, एका सीनदरम्यान रणवीरच्या डोक्याला इजा झाली होती. यानंतर जखमी रणवीरला तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले होते. पण प्राथमिक उपचारानंतर रणवीर लगेच कामावर परतला होता. डोक्याला जखम होवूनही त्याच अवस्थेत रणवीरने शूटींग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. पण ही जखम अक्षरश: ठसठसत होती. रणवीरच्या डोक्यात प्रचंड ठणक उठली होती आणि रणवीर शूटींग करत होता. कदाचित इतक्या वेदना सहन करून शूटींग करत असल्यामुळे अभिनय न करताच रणवीर या सीन्समध्ये भयंकर दिसू लागला होता. एकीकडे चेह-यावर सूज आल्याने  त्याचा चेहरा आपोआप उग्र झाला होता आणि दुसरीकडे रणवीर क्लायमॅक्समध्ये अगदी परफेक्ट फ्रेममध्ये उतरत होता. वेदना चेह-यावर उतरल्याने क्लायमॅक्ससाठी आवश्यक असा उग्र, भयंकर चेहरा रणवीरला आपोआप मिळाला होता. क्लायमॅक्सच्या या सीनमध्ये रणवीरच्या चेह-यावर अनेक घाव तुम्हाला दिसतील. यातलीच एक  घाव अगदी खरा आहे.


एकंदर काय तर भन्साळींनी रणवीरच्या एका रिअल लाईफ अ‍ॅक्सिडंटचा अगदी पूरेपूर फायदा घेतला होता. ‘पद्मावती’चा क्लायमॅक्स सीन बघाल तेव्हा तुम्हालाही हे पटेल.

Web Title: Ranveer Singh was the winner of 'Padmavati'; How to know?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.