Exclusive: अभिनयासह 'या' क्षेत्रात नशीब आजमावणार रणवीर सिंग, वाचून तुम्हाला ही वाटेल कौतूक
By गीतांजली | Updated: March 28, 2019 13:40 IST2019-03-28T13:34:47+5:302019-03-28T13:40:58+5:30
रणवीर सिंगने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. रणवीरचा काही दिवसांपूर्वी आलेल्या 'गली बॉय' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला

Exclusive: अभिनयासह 'या' क्षेत्रात नशीब आजमावणार रणवीर सिंग, वाचून तुम्हाला ही वाटेल कौतूक
रणवीर सिंगने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. रणवीरचा काही दिवसांपूर्वी आलेल्या 'गली बॉय' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. यात रणबीरने साकारलेल्या मुरादच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतले. रणवीरने यात एका दुर्लक्षित समाजातील मुलाचा रॅपरपर्यंत पोहोचण्याचा प्रवास जिंवत केला आहे. मुरादच्या भूमिकेपर्यंत न थांबता रणवीरने एक पाऊल पुढे टाकले आहे. नव्या प्रतिभाशाली मुलांचे टॅलेंटपुढे आणण्यासाठी इंक इंक या म्युझिक वेंचरला तो लाँच करतोय. इंक इंक हा म्युझिक वेंचर रणवीर आणि निर्माते तसेच संगीताचा प्रचारक नवजार इरानी यांच्यासोबत मिळून भारतात लाँच करतोय. इंक इंकच्या माध्यमातून रणवीर आणि नवजार नवीन टॅलेंट रॅपर आणि हिप हॉप गाणाऱ्या तरुणांना संधी देणार.
याबाबत बोलताना रणवीर म्हणाला, आम्ही सुरुवातीला अतिशय प्रतिभाशाली रॅपर आणि हिप हॉप करणाऱ्या कलाकारांना लाँच करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की इंक इंकच्या माध्यमातून संगीतातले नवे सुपरस्टार आपल्याला मिळातील. इंक इकं शुक्रवारी (उद्या) आपला पहिला सिंगल म्युझिक व्हिडीओ लाँच करणार आहे.
वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर रणवीर लवकरच रणवीर '८३' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमातून भारतीय विश्वचषकाच्या विजयाची कथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात येणार आहे. यात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. सिनेमाच्या शूटिंग आधी कलाकारांसाठी मोहालीमध्ये एक बूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर '८३'ची टीम शूटिंग करिता लंडनसाठी 15 मे रोजी रवाना होणार आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल, २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.