VIDEO: 'घाबरू नकोस, तुझा बाप आहे ना!', अवॉर्ड घेताना पुन्हा भावूक झाला रणवीर सिंग; सांगितली जुनी आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 12:23 PM2022-11-20T12:23:56+5:302022-11-20T12:24:46+5:30

अभिनेता रणवीर सिंगनं २०१० साली 'बँड बाजा बारात' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. आज रणवीर मेहनत आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलीवूडमधील टॉप अभिनेता बनला आहे.

Ranveer Singh tears up as he dedicates Superstar of the Decade award to mum dad | VIDEO: 'घाबरू नकोस, तुझा बाप आहे ना!', अवॉर्ड घेताना पुन्हा भावूक झाला रणवीर सिंग; सांगितली जुनी आठवण

VIDEO: 'घाबरू नकोस, तुझा बाप आहे ना!', अवॉर्ड घेताना पुन्हा भावूक झाला रणवीर सिंग; सांगितली जुनी आठवण

googlenewsNext

अभिनेता रणवीर सिंगनं २०१० साली 'बँड बाजा बारात' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. आज रणवीर मेहनत आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलीवूडमधील टॉप अभिनेता बनला आहे. नुकतंच रणवीर सिंग दुबईत आयोजित एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होता. दशकातील सर्वोत्कृष्ट सुपरस्टार (Superstar of the Decade) पुरस्कारानं रणवीर सिंग याला सन्मानित करण्यात आलं. यावेळी पुरस्कार स्वीकारताना रणवीर सिंग भावूक झाला आणि त्यानं जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

रणवीरचा पुरस्कार स्वीकाराताना भावूक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात रणवीरनं १२ वर्षांपूर्वी त्याच्या स्ट्रगलच्या काळातील एक किस्सा सांगितलं. रणवीरनं त्याला मिळालेला पुरस्कार आपल्या आई-वडिलांना समर्पित करत आपली भावना व्यक्त केली. "बाबा तुम्हाला आठवतंय का १२ वर्षांपूर्वी मी जेव्हा स्ट्रगल करत होतो तेव्हा मला माझा पहिलावहिला पोर्टफोलिओ तयार करायचा होता. प्रत्येक स्ट्रगलरला त्याचा पोर्टफोलिओ तयार करावा लागतो की जेणेकरुन आपले फोटो दाखवून चांगलं काम मिळवता येईल. त्यावेळी माझ्या पोर्टफोलिओचं बजेट ५० हजार रुपये इतकं सांगण्यात आलं होतं. तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. पण बाबा माझ्या पाठिशी उभे राहिले. घाबरु नकोस तुझा बाप आहे ना असं म्हणत त्यांनी मला मदत केली", असं रणवीर भरलेल्या डोळ्यांनी सांगत होता. रणवीरच्या आजवरच्या यशाचं यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देत कौतुक केलं. 

पुरस्कार सोहळ्यात अगदी पहिल्या रांगेत रणवीरचे आई-वडिल उपस्थित होते. लेकाच्या कौतुकानं आई-वडिलही भारावून गेले होते. पुरस्कारासाठी नाव घोषीत होताच रणवीरनं आई-वडिलांच्या पाया पडून स्टेजवर जाणं पसंत केलं. यावेळी रणवीरनं शेजारी बसलेल्या सुपरस्टार गोविंदा आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांचेही आशीर्वाद घेतले. 

रणवीर सिंग लवकरच अभिनेत्री आलिया भट्ट सोबत दिग्दर्शक करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर, आलियासोबतच दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी, जया बच्चन आणि धर्मेंद्र देखील पाहायला मिळणार आहेत. २८ एप्रिल २०२३ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच रणवीरनं सध्या रोहित शेट्टीच्या आगामी 'सर्कस' सिनेमाचंही शूटिंग पूर्ण केलं आहे.  

Web Title: Ranveer Singh tears up as he dedicates Superstar of the Decade award to mum dad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.