​‘पद्मावती’च्या सेटवर रणवीर सिंह जखमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2017 10:43 IST2017-05-28T05:13:16+5:302017-05-28T10:43:41+5:30

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये बिझी असलेला अभिनेता रणवीर सिंह या चित्रपटाच्या सेटवर जखमी झाल्याचे वृत्त आहे. सिनेमाच्या एका दृश्याचे ...

Ranveer Singh injured on Padmavati's set! | ​‘पद्मावती’च्या सेटवर रणवीर सिंह जखमी!

​‘पद्मावती’च्या सेटवर रणवीर सिंह जखमी!

जय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये बिझी असलेला अभिनेता रणवीर सिंह या चित्रपटाच्या सेटवर जखमी झाल्याचे वृत्त आहे. सिनेमाच्या एका दृश्याचे शूटींग सुरु असताना रणवीरच्या माथ्याला जखम झाली. जखमेतून रक्त वाहू लागल्याने सगळेच घाबरले. पण रणवीर मात्र शूटींग अर्धवट सोडायला तयार होईना. सेटवर प्राथमिक उपचार घेऊन रणवीरने आधी शॉट ओके केला आणि नंतर तो रूग्णालयात गेला. तूर्तास  त्याची प्रकृती ठीक आहे. ‘पद्मावती’च्या शूटींगवर तो पुन्हा परतल्याचेही कळतेय. रणवीरची कामावर किती निष्ठा आहे, तेच यावरून दिसते. त्याला या निष्ठेचे फळ मिळावे, हीच अपेक्षा आपण तूर्तास करूयात.






ALSO READ :  रणवीर सिंहचा हा जॉली लूक तुम्ही पाहिलाय का?

 या चित्रपटात रणवीर अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ हा चित्रपट  राणी पद्मावती आणि बादशाह अलाउद्दीन खिल्जी यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. यात रणवीर आणि दीपिका  या दोघांशिवाय शाहीद कपूरही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ‘पद्मावती’त राणी पद्मावती व अल्लाउद्दिन खिल्जी यांच्यात रोमॅण्टिक सीन चित्रित केला जाणार,अशी चर्चा ऐकून करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी अलीकडे चित्रपटाच्या सेटवर तोडफोड केली होती. इतिहासाचे चुकिचे दर्शन या चित्रपटातून घडविले जात असल्याचा आरोप भन्साली यांच्यावर करण्यात आला होता. यानंतर ‘पद्मावती’मध्ये काहीही आक्षेपार्ह असणार नाही. राणी पद्मावती हिच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, असेही काहीही पडद्यावर दाखवण्याचे आमचे प्रयत्न नाहीत, असे भन्साळी यांनी स्पष्ट केल्यानंतर हा वाद मिटला होता. त्यामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे जाते का ? असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र भंसाली याच वर्षाच्या अखेरीस‘पद्मावती’ प्रदर्शित करणार आहेत. 
    

Web Title: Ranveer Singh injured on Padmavati's set!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.