रस्त्यांवर भीक मागणा-या आपल्या एका चाहतीला रणवीर सिंगने असे केले खूश! पाहा व्हिडिओ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 14:26 IST2017-10-24T08:56:57+5:302017-10-24T14:26:57+5:30
‘बेफिक्रे’ स्टार रणवीर सिंग म्हणजे एक मस्तमौला अभिनेता. कुठलीही भीड नाही, कुठलाही आव नाही की कुठलाही अॅटिट्यूड नाही. याच रणवीरचा एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतोय.

रस्त्यांवर भीक मागणा-या आपल्या एका चाहतीला रणवीर सिंगने असे केले खूश! पाहा व्हिडिओ!!
‘ ेफिक्रे’ स्टार रणवीर सिंग म्हणजे एक मस्तमौला अभिनेता. कुठलीही भीड नाही, कुठलाही आव नाही की कुठलाही अॅटिट्यूड नाही. काल-परवा रणवीरने आपल्या पहिल्या चुंबनाची कबुली देत, अशाच ‘बेफिक्रे’ स्वभावाचे दर्शन घडवले होते.‘सातवीत असताना मी माझा फर्स्ट किस घेतला. फर्स्ट प्रॉपर किस. तो एक आगळा-वेगळा अनुभव होता. माझी ती गर्लफ्रेन्ड माझ्यापेक्षा एका वर्षांनी मोठी होती आणि वेगळ्या शाळेतील होती. तिचे गाल चांगलेच हॉट होते.तिला भेटायला मी नेहमीच टेबल टेनिसचे क्लास बुडवायचो. मला आठवतं, त्यादिवशीही टेबल टेनिसचा क्लास बुडवून मी तिला भेटायला गेलो होतो. त्या बदल्यात मला एक गोड किस मिळाला होता. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा टर्निंग पॉर्इंट होता. कारण त्यादिवसापर्यंत मी मन लावून टेबल टेनिस खेळत होता. पुढेही असाच मन लावून खेळलो असतो तर त्यावेळी चँम्पियनही बनलो असतो,’ असे रणवीरने सांगितले. यानंतर काल रणवीरने एका भीक मागणा-या मुलीसोबत हात मिळवून पुन्हा एकदा आपल्या याच ‘बेफिक्रे’ स्वभावाचे दर्शन घडवले. याचाच एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतोय.
ALSO READ: रणवीर सिंग झाला जखमी अन् ‘पद्मावती’चा झाला फायदा; जाणून घ्या कसा?
रणवीर एका इमारतीतून बाहेर येत असतानाच चाहते त्याच्याभोवती जमतात आणि सेल्फीसाठी गर्दी करतात. रणवीर अगदीच कूल अंदाजात सगळ्यांना सेल्फी देतो. यानंतर रणवीर पुढे वळतो तर त्याच्यासमोर एक भटजी येतात. रणवीर अतिशय आदराने त्यांना नमस्कार करतो. भटजीबुवाही तितक्याच प्रेमाने अगदी मंत्रोपचार करत रणवीरला तोंडभर आशीर्वाद देतात. याच गर्दीतून वाट काढ एक भीक मागणारी मुलगी रणवीरसमोर येते. तिलाही आपल्या आवडत्या अभिनेत्यासोबत हात मिळवायचा मोह होतो. ती काहीशी संकोचून हस्तांदोलनासाठी आपला हात पुढे करते आणि रणवीर कुठलेही अॅटीट्यूड न दाखवता अगदी सहजपणे तिच्यासोबत हात मिळवतो. शिवाय तिच्यासोबत हात मिळवून सगळ्यांना अभिवादन करत तितक्याच सहजपणे आपल्या कारमधून निघून जातो.
रणवीरचा हाच सरळ साधेपणा कदाचित त्याला सुपरस्टार बनवून जातो.