पद्मावतीमध्ये शाहिद कपूर आणि दीपिका पादुकोणपेक्षा रणवीर सिंगला मिळाले सगळ्यात जास्त मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 12:51 IST2017-08-23T07:21:19+5:302017-08-23T12:51:19+5:30

गेल्या अनेक महिन्यापासून संजय लीला भंसाली यांचा पद्मावती चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपटादरम्यान शाहिद कपूर आणि रणवीस ...

Ranveer Singh gets highest honor in Padmavati, Shahid Kapoor and Deepika Padukone | पद्मावतीमध्ये शाहिद कपूर आणि दीपिका पादुकोणपेक्षा रणवीर सिंगला मिळाले सगळ्यात जास्त मानधन

पद्मावतीमध्ये शाहिद कपूर आणि दीपिका पादुकोणपेक्षा रणवीर सिंगला मिळाले सगळ्यात जास्त मानधन

>गेल्या अनेक महिन्यापासून संजय लीला भंसाली यांचा पद्मावती चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपटादरम्यान शाहिद कपूर आणि रणवीस सिंग यांच्यामध्ये रंगलेल्या कोल्ड वॉरने बऱ्याच चर्चा रंगल्या. रणवीरला शाहिदचे या चित्रपटात असणे फारसे रुचले नव्हते. मात्र हळूहळू त्यांनी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवले. सध्या याचित्रपटातला घेऊन एक वेगळीच चर्चा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भंसाली रणवीर सिंगवर नाराज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पद्मावतीसाठी सगळ्यात जास्त मानधन रणवीर सिंगने घेतले. दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूरने याचित्रपटासाठी 10 कोटींचे मानधन आकारले तर रणवीर सिंगला 13 कोटी देण्यात आले.

ALSO READ : ​दीपिका पादुकोण अन् रणवीर सिंहची ‘सीक्रेट डिनर डेट’ लीक !!
 
रणवीर सिंगने कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपले वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. रणवीरला या चित्रपटासाठी यासाठी जास्त मानधन देण्यात आले कारण चित्रपटाच्या मेकर्सच्या मते शाहिद आणि दीपिकापेक्षा रणवीर मोठा स्टार आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य चोप्रानेसुद्धा रणवीरची तुलना किंग खानसोबत केली होती.  पद्मावतीमध्ये रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राणी पद्मावतीची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार आहे. तर पद्मावतीच्या पतीच्या म्हणजेच चित्तौडचा राजा रावल रत्न सिंगचा भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी शाहिदने सहा प्रकारच्या तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. ‘पद्मावती’ हा चित्रपट चितौडगढची राणी पद्मिनी आणि बादशाह अलाउद्दीन खिलजी यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Web Title: Ranveer Singh gets highest honor in Padmavati, Shahid Kapoor and Deepika Padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.