आयपीएलध्ये परफॉर्म करण्यासाठी रणवीर सिंग नाही तर या अभिनेत्याला मिळणार जास्त रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 12:26 IST2018-03-29T06:56:07+5:302018-03-29T12:26:07+5:30
सध्या रणवीर सिंग हा एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला होता. त्याला 11 व्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या ओपनिंग ...
.jpg)
आयपीएलध्ये परफॉर्म करण्यासाठी रणवीर सिंग नाही तर या अभिनेत्याला मिळणार जास्त रक्कम
स ्या रणवीर सिंग हा एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला होता. त्याला 11 व्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या ओपनिंग सेरिमनीमध्ये परफॉर्म करण्यासाठी एक भारी भक्कम रक्कम देण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी रणवीरसह वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिस आणि परिणीती चोप्रासुद्धा परफॉर्म करणार आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी परफॉर्म करण्यासाठी रणवीर पेक्षा मोठी रक्कम वरुण धवनाला मिळणार असल्याचे समजते आहे.
डीएनएच्या रिपोर्टनुसार, रणवीर सिंगला ओपनिंग सेरिमनीमध्ये परफॉर्म करण्यासाठी 5 कोटी देण्यात येणार आहेत तर ऑर्गनाइजर्सने वरुणला जवळपास 6 कोटी देणार आहेत. मात्र अजूनपर्यंत त्यांच्याकडून कोणतीच रक्कम अधिकृतरित्या सांगण्यात आलेली नाही. रिपोर्टनुसार वरुणला यासाठी जास्त पैसे देण्यात आले आहेत कारण त्याचा परफॉर्मन्सचा कालावधी जास्त आहे.
ALSO READ : वरूण धवनला मनातल्या मनात छळतेयं ‘ही’ एकचं गोष्ट!!
वरुण धवन 'ब्रदीनाथ की दुल्हनिया' आणि 'जुडवा 2'मधील गाण्यावर परफॉर्म करणार आहे. कदाचिक काही गाण्यावर जॅकलिनसुद्धा त्याच्यासोबत थिरकताना दिसणार आहे. सध्या वरुण धवन सुई धागाच्या शूटमध्ये व्यस्त आहे. तर त्याचा अक्टूबर चित्रपट रिलीजसाठी तयार आहे. येत्या १३ एप्रिलला रिलीज होऊ घातलेल्या या चित्रपटात वरूण एका हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात एक वेगळी आणि हटके कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुजीत यांना वृत्तपत्रातील एका बातमीवरून या चित्रपटाची कथा सुचली होती. शुजीत सरकार ‘पीकू’ या चित्रपटावर काम करीत असताना अचानक वृत्तपत्रातील एका बातमीने त्यांचे लक्ष वेधले होते. याच बातमीने शुजीत यांना त्यांच्या ‘अक्टूबर’ या चित्रपटासाठी एक आगळीवेगळी कथा दिली. शुजीत यांच्या मते, हा एक स्लाइस आॅफ लाइफ चित्रपट असेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक नवा एक्सपीरियन्स असेल. या चित्रपटातून बनिता संधू बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतेय.