रणवीर-डिप्पी पुन्हा येणार एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 22:16 IST2016-02-27T05:16:16+5:302016-02-26T22:16:16+5:30

२०१५ हे वर्ष रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन या हॉट कपलसाठी खुप महत्त्वाचे ठरले. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ...

Ranveer-Dpi to come together again? | रणवीर-डिप्पी पुन्हा येणार एकत्र?

रणवीर-डिप्पी पुन्हा येणार एकत्र?

१५ हे वर्ष रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन या हॉट कपलसाठी खुप महत्त्वाचे ठरले. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी ’मुळे दोघांनीही सर्वांच्या मनात अधिराज्य गाजवायला सुरूवात केली. बाजीराव मस्तानीच्या यशामुळे आता संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सध्या बॉलीवूडमध्ये याविषयी चर्चा आहे की, संजय दत्तचा सुपरहिट चित्रपट ‘खलनायक’ चा रिमेक बनवण्याचा विचार भन्साळी करत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, भन्साळी हे एका वेगळ्या विषयावर चित्रपट बनवण्याचा विचार करत आहेत. स्क्रिप्टवर ते काम करत आहेत. युरोपमध्ये शूट के लेली ती मॉडर्न लव्हस्टोरी असणार आहे. आता बाजीराव मस्तानी मॉडर्न लुकमध्ये दिसणार असे वाटतेय! लेट्स सी... चित्रपटाचे नाव आणि कथा लवकरच जाहीर होईल.

 

Web Title: Ranveer-Dpi to come together again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.