अखेर रानू मंडलला भेटला बॉयफ्रेंड?, बाईकवर मुलासोबत दिसली रोमांस करताना, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 11:18 AM2022-12-26T11:18:16+5:302022-12-26T11:18:37+5:30

Ranu Mandal : रानू मंडल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Ranu Mandal finally met her boyfriend?, she was seen romancing her son on a bike, the video went viral. | अखेर रानू मंडलला भेटला बॉयफ्रेंड?, बाईकवर मुलासोबत दिसली रोमांस करताना, व्हिडीओ व्हायरल

अखेर रानू मंडलला भेटला बॉयफ्रेंड?, बाईकवर मुलासोबत दिसली रोमांस करताना, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच जण प्रकाशझोतात आले. ज्यांना एका रात्रीत खूप लोकप्रियता मिळाली. याचे मोठे उदाहरण म्हणजे रानू मंडल (Ranu Mandal). रानू मंडलच्या सुरेल आवाजाने देशभरातील अनेक लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. रानू मंडल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावेळी रानू एका मुलासोबतच्या तिच्या रोमँटिक गाण्यासाठी खूप चर्चेत आहे. रानू मंडलची गाण्यातील नवीन स्टाईल नेटकऱ्यांना खूप भावते आहे. लोक म्हणतात की रानूला तिचा कानू सापडला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, रानू मंडल एका मुलासोबत बाईकच्या मागे बसलेली दिसत आहे. रानू मागे बसून काहीतरी गुणगुणत आहे आणि मुलगा गाणे गुणगुणत आहे. राणूबद्दल सांगायचे तर ती अनेकदा व्हिडीओमध्ये स्वतःची खिल्ली उडवते. पण यावेळी तिला आणि त्याच्यासोबत बसलेला मुलगा या दोघांवर लोकांचा राग आहे. लोकांचे म्हणणे आहे की हा मुलगा त्याच्या आईच्या वयाच्या महिलेसोबत रोमँटिक गाण्यावर रील बनवत आहे. लाज वाटावी... आजकाल लोक सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करायला तयार असतात.


हा व्हिडिओ रोहन शॉ नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत. एका यूजरने या दोघांना विक्रम वेताल म्हटले आहे. दुसरीकडे, एकाने रानूला अखेर तिचा कानू मिळाला असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Ranu Mandal finally met her boyfriend?, she was seen romancing her son on a bike, the video went viral.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.