१० वर्षांनी लहान बेबोला डेट करणाऱ्या सैफला राणीने दिलेला सल्ला, म्हणालेली - "तू करीनाला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:51 PM2024-01-24T12:51:37+5:302024-01-24T12:52:00+5:30

Saif Ali Khan - Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश कपल्सपैकी एक आहेत. दोघे लव्ह लाइफमुळे नेहमीच चर्चेत येत असतात.

Rani Mukharjee's advice to Saif Ali Khan, who dated younger Bebo aka Kareena Kapoor after 10 years, said - "You Kareena..." | १० वर्षांनी लहान बेबोला डेट करणाऱ्या सैफला राणीने दिलेला सल्ला, म्हणालेली - "तू करीनाला..."

१० वर्षांनी लहान बेबोला डेट करणाऱ्या सैफला राणीने दिलेला सल्ला, म्हणालेली - "तू करीनाला..."

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश कपल्सपैकी एक आहेत. दोघे लव्ह लाइफमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. सैफ आणि करीना टशन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जवळ आले होते. दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फुलली होती. एका मुलाखतीत सैफ अली खानने खुलासा केला होता की, जेव्हा सुरूवातीला तो करीनाला डेट करत होता आणि राणी मुखर्जीला याबद्दल समजले होते. तेव्हा तिने त्याला मोलाचा सल्ला दिला होता.

सैफ अली खान म्हणाला होता की, मला आठवतंय जेव्हा राणीला कळले होते की मी करीनाला डेट करतो आहे, तेव्हा ती म्हणाली की तू स्त्री-पुरूष अशा भेदभावात अडकू नकोस. करीनाला समान वागणूक दे. जणू एका घरात दोन नायक राहतात. दोन लोक काम करत आहेत आणि तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. सैफ पुढे म्हणाला, मला वाटतं राणी योग्य बोलली होती. २००७ मध्ये डेटिंग सुरू झाल्यानंतर करीना-सैफ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये लग्न केले.

सैफ आणि करीनामध्ये आहे १० वर्षांचा फरक
लग्नानंतर सैफ अली खान आणि करीना कपूर तैमूर आणि जेह या दोन मुलांचे पालक झाले. सैफ आणि करीना यांच्या वयात जवळपास १० वर्षांचा फरक आहे. सैफ ५३ वर्षांचा आहे. तर करीना ४३ वर्षांची आहे. करीना ही सैफची दुसरी पत्नी आहे. त्याआधी सैफने त्याच्यापेक्षा १२ वर्षे मोठ्या अमृता सिंगसोबत लग्न केले होते. दोघांचे लग्न १३ वर्षे टिकले. या काळात ते सारा अली खान आणि इब्राहिम अली खान या दोन मुलांचे पालक झाले. पुढे दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

Web Title: Rani Mukharjee's advice to Saif Ali Khan, who dated younger Bebo aka Kareena Kapoor after 10 years, said - "You Kareena..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.