राणी मुखर्जीच्या दिराचे पुन्हा झाले ब्रेकअप; घर सोडून गेली गर्लफ्रेंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 21:02 IST2018-04-25T15:32:29+5:302018-04-25T21:02:29+5:30
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा दीर उदय चोपडा आणि त्याची गर्लफ्रेंड नर्गिस फाखरी यांच्यात ब्रेकअप झाल्याची बातमी पुन्हा एकदा ...

राणी मुखर्जीच्या दिराचे पुन्हा झाले ब्रेकअप; घर सोडून गेली गर्लफ्रेंड!
ब लिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा दीर उदय चोपडा आणि त्याची गर्लफ्रेंड नर्गिस फाखरी यांच्यात ब्रेकअप झाल्याची बातमी पुन्हा एकदा समोर येत आहे. वृत्तानुसार, उदय आणि त्याची आई पामेला चोपडासोबत त्याच्या घरी नर्गिस राहत होती. परंतु उदयसोबत सातत्याने संबंध ताणले जात असल्या कारणाने ती घर सोडून निघून गेली आहे. दरम्यान, मधल्या काळात अशी बातमी समोर आली होती की, दोघांच्या लग्नासाठी पामेला चोपडा यांनी होकार दिला होता. मात्र आता या दोघांचे ब्रेकअप झाल्याचे जवळपास निश्चित असल्याने ते पुन्हा एकदा एकत्र येतील काय? याविषयी चाहत्यांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, नर्गिस जेव्हा-जेव्हा मुंबईत असते तेव्हा-तेव्हा ती उदय आणि पामेलासोबत त्यांच्या घरी राहत असते. एवढेच काय तर घरातील सर्वच सदस्य नर्गिसला वहिनी या नावाने बोलावतात. एका एंटरटेनमेंट पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, पुन्हा एकदा या दोघांनी वेगवेगळ्या मार्गाने जाणे योग्य समजले असून, त्यांच्यात ब्र्रेकअप झाले आहे. गेल्या १६ एप्रिल रोजी नर्गिसने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अमेरिकन दिग्दर्शक मॅट अलोंजो याच्यासोबतचे काही फोटोज शेअर केले होते.
![]()
या फोटोमध्ये नर्गिस मॅटचा बर्थ डे सेलिब्रेट करताना दिसत होती. त्याबाबतचा तिने एक व्हिडीओही शेअर केला होता. ज्यामध्ये मॅट नर्गिसला किस करताना दिसत होता. रिपोर्ट्सनुसार, उदय आणि नर्गिसच्या ब्रेकअपचे कारण मॅट असल्याचेच बोलले जात आहे. दरम्यान, नर्गिस तिच्या चित्रपटांपेक्षा उदयसोबतच्या अफेअरमुळेच अधिक चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती याच कारणामुळे चर्चेत आली आहे.