Rangoon Making of : गोठवणाऱ्या थंडीत अरूणाचल प्रदेशमध्ये अशी झाली ‘रंगून’ ची शूटींग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 18:15 IST2017-01-31T12:45:12+5:302017-01-31T18:15:12+5:30

लाँच करण्यात आलेली चित्रपटातील गाणीही नादमधूर अशा संगीताचा प्रवास प्रेक्षकांना घडवून आणत आहेत. यूट्यूबवर लाखो हिट्स या गाण्यांना मिळत आहेत.

Rangoon Making of: In Arunachal Pradesh, freezing cold, shooting of 'Rangoon' ... | Rangoon Making of : गोठवणाऱ्या थंडीत अरूणाचल प्रदेशमध्ये अशी झाली ‘रंगून’ ची शूटींग...

Rangoon Making of : गोठवणाऱ्या थंडीत अरूणाचल प्रदेशमध्ये अशी झाली ‘रंगून’ ची शूटींग...

ंगून’ हा चित्रपट दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळातील घडामोडींवर आधारित असून कंगना राणौत, शाहिद कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिकेतील या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच लाँच करण्यात आलाय. लाँच करण्यात आलेली चित्रपटातील गाणीही नादमधूर अशा संगीताचा प्रवास प्रेक्षकांना घडवून आणत आहेत. यूट्यूबवर लाखो हिट्स या गाण्यांना मिळत आहेत. पण, तुम्हाला माहितीये का की, या चित्रपटाची शूटिंग कशी झाली ते? नुकताच ‘रंगून’ चा ‘मेकिंग आॅफ’ खास चाहत्यांसाठी चित्रपटाच्या टीमकडून लाँच करण्यात आला आहे. अरूणाचल प्रदेशमध्ये गोठवणाऱ्या थंडीत संपूर्ण टीमने कशी शूटींग केली ? पाहा या मेकिंग आॅफ..मध्ये...

ALSO READ : ​शाहिद कपूर म्हणतो, कंगना राणौत सोबत माझे मतभेद नाहीत!



‘ब्लडी हेल’,‘ये इश्क हैं’,‘ मेरे मियाँ गये इंग्लंड’ या ट्रॅकमध्ये कंगना राणौत आणि शाहिद कपूर यांची रोमँटिक केमिस्ट्री दिसून आली. पण, गाण्यांचे शूटिंग अरूणाचल प्रदेशमध्ये करताना टीमला थंडीच्या माऱ्या पासून स्वत:चा बचाव करावा लागला. मेकिंग आॅफमध्ये शूटिंगविषयीचा अनुभव शेअर करताना कंगना म्हणते,‘आम्ही थंडी वाजू लागली की, सर्वजण एकमेकांच्या जवळ येऊन उभे राहत होतो. जेव्हा ऊन पडू लागले तेव्हा मग आम्ही एकमेकांना स्वत:पासून दूर ढकलत होतो. एकंदर काय आम्ही मस्त धम्माल केली.’ शाहिद म्हणाला,‘ माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमधील रंगूनचा अनुभव अत्यंत कठीण होता. अत्यंत वेगळा आणि अदभुत असा हा अनुभव माझ्यासाठी होता.’ 

ALSO READ : सैफ अन् शाहीदच्या मिशांमुळे इतकी का वैतागली कंगना राणौत?

विशाल भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात कंगना ज्युलियाची भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगना आधी सैफसोबत दिसते तर नंतर शाहिदसोबत. म्हणजेच, सैफ आणि शाहिद या दोघांच्या लेडी लव्हची भूमिका कंगना यात साकारतेय. फेबु्रवारीच्या अखेरच्या आठवड्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘रंगून’ची कथा १९४० च्या दशकातील आहे. द्वितीय महायुद्धाची पार्श्वभूमी असलेल्या या  चित्रपटासाठी कंगनाने  ‘फिअरलेस नादिया’पासून प्रेरणा घेतली असल्याचे सांगण्यात येते. 

Web Title: Rangoon Making of: In Arunachal Pradesh, freezing cold, shooting of 'Rangoon' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.