रणदीपला मिळालं त्याच्या कामाचं कौतुक करणारं पत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 09:55 IST2016-05-21T04:25:52+5:302016-05-21T09:55:52+5:30

 शीर्षक वाचून तुम्ही विचारात पडला असाल की, रणदीप हुडाचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘सरबजीत’ यातील त्याचा अभिनय खरंच कौतुकास्पद ...

Randeep's letter praising his work! | रणदीपला मिळालं त्याच्या कामाचं कौतुक करणारं पत्र!

रणदीपला मिळालं त्याच्या कामाचं कौतुक करणारं पत्र!


/> शीर्षक वाचून तुम्ही विचारात पडला असाल की, रणदीप हुडाचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘सरबजीत’ यातील त्याचा अभिनय खरंच कौतुकास्पद असून त्याचे सर्वत्र कौतुक सुरू आहे. पण, आता हे कौतुक करणारं पत्र कोणी लिहिले असेल? तर कोणी दुसºयानी नव्हे तर स्वत: अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे.

बिग बी यांनी ही नोट टिवटरवर पोस्ट केली आहे. हे पत्र त्यांनी स्वत:च्या हातानी लिहिलेले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘मी कालच चित्रपट पाहिला, तुझा अभिनय अतिशय सुंदर आहे. तुझ्या अभिनयातून उत्तम संदेश तू प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. सरबजीत असाच असेल! असा समज प्रेक्षकांचा झाला आहे.

कोणत्याही कलाकारासाठी हेच खरंतर खुप महत्त्वाचे असते की, त्याच्या अभिनयाचे कौतुक त्याच्या सारख्याच कलाकाराने करायला हवेय. ’ या चित्रपटात बिग बी यांची सून ऐश्वर्या रॉय बच्चन दलबीर कौरच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्याही अभिनयाचे कौतुक त्यांनी केले.

appriciation note

Web Title: Randeep's letter praising his work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.