मुहूर्त ठरला ! या तारखेला बोहल्यावर चढणार रणदीप हुड्डा, मुंबईत देणार ग्रँड रिसेप्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 01:38 PM2023-11-25T13:38:36+5:302023-11-25T13:40:38+5:30

काही जवळचे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत मणिपूरमध्ये लग्न झाल्यानंतर अभिनेता रणदीप हुड्डा मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहे.

randeep hoodas wedding date confirmed will married gf lin laishram in manipur | मुहूर्त ठरला ! या तारखेला बोहल्यावर चढणार रणदीप हुड्डा, मुंबईत देणार ग्रँड रिसेप्शन

मुहूर्त ठरला ! या तारखेला बोहल्यावर चढणार रणदीप हुड्डा, मुंबईत देणार ग्रँड रिसेप्शन

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा लवकरच त्याची गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत लग्न करणार आहे. लवकरच अभिनेता बोहल्यावर चढणार आहे. दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी रणदीप लिनसोबत सात फेरे घेणार असल्याची चर्चा आहे. लग्न आणि सर्व विधी मणिपूरमध्ये होतील.

मीडिया रिपोर्टनुसार, रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम 29 नोव्हेंबरला मणिपूरमध्ये लग्न करणार आहेत. २९ नोव्हेंबरला दुपारपासून सुरू होणारे लग्नाचे विधी रात्रीपर्यंत चालणार आहेत. मणिपूरच्या परंपरेनुसार हे कपल मणिपुरी पोशाख घालून लग्न करणार आहेत. काही जवळचे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत मणिपूरमध्ये लग्न झाल्यानंतर अभिनेता रणदीप हुड्डा मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहे. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चेहरे रिसेप्शनला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 


रणदीप आणि लिन 2016 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लिन ही मणिपूरची रहिवासी आहे आणि ती व्यवसायाने भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे.रणदीपची होणारी बायको ही त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. रणदीप हुड्डा 47 वर्षांचा आहे, तर लिन लैशराम 37 वर्षांची आहे.  उर्मिका, रंगून आणि अवा मारिया या हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

रणदीप हुड्डा यांनी 2021 साली लिनच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. रणदीप हुडाच्या लग्नाच्या बातमीने अभिनेत्याचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. रणदीपच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच 'स्वातंत्र्य वीर सावरकर'मध्ये दिसणार आहे. यामध्ये तो स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेत आहे. यापूर्वी रणदीप ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजमध्ये दिसला होता. 
 

Web Title: randeep hoodas wedding date confirmed will married gf lin laishram in manipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.