रणदीप हुड्डाने सोशल मीडियाद्वारे दिली ही दुःखद बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 05:34 PM2019-05-28T17:34:48+5:302019-05-28T18:06:34+5:30

रणदीपनेच सोशल मीडियावर त्याच्या आजींचा फोटो शेअर करून ही वाईट बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

Randeep Hooda's grandmother passes away at 97 | रणदीप हुड्डाने सोशल मीडियाद्वारे दिली ही दुःखद बातमी

रणदीप हुड्डाने सोशल मीडियाद्वारे दिली ही दुःखद बातमी

googlenewsNext
ठळक मुद्देरणदीपने लिहिले आहे की, माझ्या आजीचे नुकतेच निधन झाले असून ती नेहमीच आम्हाला सगळ्यांना सगळ्या गोष्टीत पाठिंबा देत असे. तसेच तिच्यामुळे आमच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असायचे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो...

रणदीप हु्ड्डाच्या आजीचे नुकतेच निधन झाले असून त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्या दीर्घ काळापासून आजारी होत्या. रणदीपनेच सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर करून ही वाईट बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. विशेष म्हणजे ही बातमी त्याने त्याच्या मातृभाषेत म्हणजेच हरयाणवी भाषेत दिली आहे.

रणदीपने त्याच्या आजीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्याची आजी अतिशय आनंदीत दिसत आहे. या फोटोसोबत रणदीपने लिहिले आहे की, माझ्या आजीचे नुकतेच निधन झाले असून ती नेहमीच आम्हाला सगळ्यांना सगळ्या गोष्टीत पाठिंबा देत असे. तसेच तिच्यामुळे आमच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असायचे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो...

 

रणदीपच्या वडिलांच्या त्या आई असून त्या हरियाणामध्येच राहायच्या. रणदीप त्याच्या आजीचा प्रचंड लाडका होता हे त्याने शेअर केलेल्या फोटोंमधून दिसून येत आहे. तसेच रणदीपने याआधी देखील अनेक वेळा त्याच्या आजीसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. रणदीपदेखील मुळचा हरियाणाचाच आहे. हरियाणाच्या रोहतकमध्ये रणदीपचा जन्म झाला होता. फार कमी काळात रणदीपने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘मान्सून वेडिंग’, ‘सरबजीत’ ते ‘लाल रंग’पर्यंतच्या अनेक चित्रपटातील त्याचा अभिनय वाखाणण्याजोगा होता. २००१ मध्ये ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटाद्वारे रणदीपने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. पण यानंतर सलग चार वर्षं रणदीपला कुणीही काम देईना. यानंतर २००५ मध्ये रामगोपाल वर्मा यांनी त्याला आपल्या ‘डी’ चित्रपटासाठी साइन केले आणि यानंतर रणदीपने कधीच मागे वळून पाहिले नाही.

अभिनयात येण्यापूर्वी रणदीपने ड्रायव्हर, वेटरचेही काम केले आहे. मेलबर्नमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना एका चायनीज हॉटेलमध्ये रणदीपने वेटरचे काम केले. या काळात तो कार वॉशिंगही करायचा. त्यानंतर त्याने जवळजवळ दोन वर्षं टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केले. २००० मध्ये रणदीप भारतात परतला, तो अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊनच. भारतात रणदीपने एका  एयरलाइनच्या मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम केले आणि सोबतच मॉडलिंगही सुरू केले. मॉडेलिंग करता करता त्याला अभिनयक्षेत्रात संधी मिळाली. 

Web Title: Randeep Hooda's grandmother passes away at 97

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.