रणबीर-कॅटरिना डॉक्टरांकडे एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 20:24 IST2016-03-19T03:24:59+5:302016-03-18T20:24:59+5:30
रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ या दोघांच्याही बे्रकअपच्या बातम्या आपल्या कानावर आल्या असतीलच. पण अलीकडे हे दोघेही एकत्र डॉक्टरांकडे ...

रणबीर-कॅटरिना डॉक्टरांकडे एकत्र?
र बीर कपूर आणि कॅटरिना कैफ या दोघांच्याही बे्रकअपच्या बातम्या आपल्या कानावर आल्या असतीलच. पण अलीकडे हे दोघेही एकत्र डॉक्टरांकडे दिसल्याने ब्रेकअप की पॅचअप असा प्रश्न या दोघांच्याही चाहत्यांना पडला आहे. रणबीर व कॅट दोघेही ‘जग्गा जासूस’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सेटवर शॉट संपला की, दोघेही परस्परांना टाळत असल्याच्याही बातम्या आहेत. मात्र आता गोपनीय सूत्रांनी वेगळीच स्टोरी सांगितली आहे. गत आठवड्यात रणबीर व कॅटरिना या दोघांची कार बांद्रातील एका स्किन क्लिनिकबाहेर पार्क दिसली. या क्लिनिकमध्ये दोघेही जवळपास दोन तास एकत्र होते. रूटीन चेकअपसाठी ही व्हिजिट असल्याचे सांगितले गेले. रूटीन चेकअप आपण समजू शकतो हो! पण दोघेही एकत्र क्लिनिकमध्ये गेले म्हणून गोंधळ वाढला आहे. बाबांनो, तुमच्यात नेमके चाललेयं तरी काय???