रणबीर कपूरचा 'अॅनिमल' लवकरच येणार भेटीला, एप्रिलमध्ये पूर्ण होणार शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 20:12 IST2023-03-22T20:11:49+5:302023-03-22T20:12:11+5:30
Ranbir Kapoor : रणबीर कपूरच्या 'तू झूठी मै मक्कार' या चित्रपटानं १०० कोटींचा आकडा पार केल्यानंतर सिनेप्रेमींना आता त्याच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आहे.

रणबीर कपूरचा 'अॅनिमल' लवकरच येणार भेटीला, एप्रिलमध्ये पूर्ण होणार शूटिंग
रणबीर कपूर(Ranbir Kapoor)च्या 'तू झूठी मै मक्कार' या चित्रपटानं १०० कोटींचा आकडा पार केल्यानंतर सिनेप्रेमींना आता त्याच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आहे. रणबीरही आपल्या चाहत्यांना खुश करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. मागील काही दिवसांपासून तो 'अॅनिमल' या आगामी हिंदी चित्रपटाच्या कामात बिझी आहे.
संदीप रेड्डी वनगा यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या गँगस्टर ड्रामासाठी बॅाबी देओलसोबत रणबीर लंडनच्या दिशेनं उड्डाण करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्याही भूमिका आहेत. 'अॅनिमल'चं अंतिम शेड्यूल एप्रिलमध्ये होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटाचं भारतातील शूटिंग पूर्ण झालं असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात युके आणि नंतर स्कॅाटलंडमध्ये शूट केलं जाणार आहे. हे २०-२५ दिवसांचं शूट असून एप्रिल महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.
या चित्रपटात रणबीर कपूरशिवाय अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याआधी २०२१ मध्ये अॅनिमलचा टीझर रिलीज झाला होता. याआधी होळीच्या सणादरम्यान रणबीर कपूरचा चित्रपट तू झुठी मैं मक्कार सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याची आणि श्रद्धा कपूरची जोडी लोकांना खूप आवडली होती. रणबीर आणि श्रद्धा कपूरचा हा पहिलाच चित्रपट आहे.