​ रणबीर कपूर लग्नासाठी तयार, आईने पसंत केलेल्या मुलीला दिला होकार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 12:10 IST2017-05-23T06:40:22+5:302017-05-23T12:10:22+5:30

रणबीर कपूर कायम त्याच्या लव्ह अफेअर्समुळे चर्चेत असतो. सोनम कपूर, दीपिका पादुकोण, कॅटरिना कैफ अशा अनेकांसोबत रणबीर रिलेशनशिपमध्ये होता. ...

Ranbir Kapoor is ready for marriage, mother given to mother of choice !! | ​ रणबीर कपूर लग्नासाठी तयार, आईने पसंत केलेल्या मुलीला दिला होकार!!

​ रणबीर कपूर लग्नासाठी तयार, आईने पसंत केलेल्या मुलीला दिला होकार!!

बीर कपूर कायम त्याच्या लव्ह अफेअर्समुळे चर्चेत असतो. सोनम कपूर, दीपिका पादुकोण, कॅटरिना कैफ अशा अनेकांसोबत रणबीर रिलेशनशिपमध्ये होता. पण काळाससोबत हे रिलेशन संपले आणि रणबीर सिंगल झाला. आता रणबीर सिंगल म्हटल्यावर घरच्यांना काळजी तर वाटणारच ना. मग काय, रणबीरची आई नीतू सिंग यांनी रणबीरसाठी मुलगी निवडली. तीही थेट लंडनची. आता कदाचित याच लंडनच्या मुलीशी संसार थाटण्याचे मन रणबीरने बनवले आहे. होय, रणबीरने आईच्या पसंतीला होकार दिल्याची बातमी आहे. रणबीर कपूर अलीकडे आईसोबत लंडनमध्ये हॉली डे वर गेला होता. कामातून बे्रक घेण्यासाठी रणबीरने या सुट्ट्या प्लान केल्याचे मानले गेले होते. पण असे नव्हतेच मुळी. रणबीर व नीतू दोघेही एका खास कारणाने लंडनला गेले होते. हे कारण म्हणजे रणबीरचे लग्न. आईने पसंत केलेल्या लंडनच्या एका मुलीला भेटायला रणबीर गेला होता. येथील एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगी नीतू यांनी रणबीरसाठी पसंत केली आहे. आईने पसंत केलेली ही मुलगी रणबीरलाही आवडल्याचे कळतेय. कपूर फॅमिलीशी निकटचे संबंध असलेल्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नीतू सिंह यांनी या मुलीचा प्रस्ताव रणबीरसमोर ठेवला. तू आई-वडिलांच्या आवडीने लग्न करावेस, असे आम्हाला वाटते, असे त्या रणबीरला म्हणाल्या आणि आश्चर्य म्हणजे रणबीरनेही आईला लगेच होकार दिला. त्यामुळे कपूर फॅमिलीत लवकरच सून येण्याची शक्यता आहे. अर्थात अद्याप काहीही फायनल झालेले नाही.
तूर्तास रणबीर संजय दत्तच्या बायोपिकमध्ये बिझी आहे. यानंतर तो ‘ड्रगन’ या सिनेमात बिझी होणार आहे. याशिवाय त्याचा ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे.

Web Title: Ranbir Kapoor is ready for marriage, mother given to mother of choice !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.