Indian Idol 14च्या मंचावर भावुक झाला रणबीर कपूर, कंटेस्टंटच्या पडला पाया, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 01:35 PM2023-11-25T13:35:37+5:302023-11-25T13:36:13+5:30

Ranbir Kapoor And Rashmika Mandanna : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना त्यांचा आगामी चित्रपट अ‍ॅनिमलच्या प्रमोशनसाठी सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडॉल सीझन १४ मध्ये आले होते. यादरम्यान स्पर्धक रेणुकाचा सुरेल स्वरांनी रणबीर आणि रश्मिकाच्या मनाचा ठाव घेतला.

Ranbir Kapoor got emotional on the stage of Indian Idol 14, fell on the contestant's feet, the video is going viral | Indian Idol 14च्या मंचावर भावुक झाला रणबीर कपूर, कंटेस्टंटच्या पडला पाया, व्हिडीओ होतोय व्हायरल

Indian Idol 14च्या मंचावर भावुक झाला रणबीर कपूर, कंटेस्टंटच्या पडला पाया, व्हिडीओ होतोय व्हायरल

'इंडियन आयडॉल सीझन १४' (Indian Idol 14) या सिंगिंग रिएलिटी शोमध्ये अनेक प्रतिभावान गायक आपल्या सुरेल आवाजाची जादू दाखवत आहेत. यापैकी एक नाव म्हणजे रेणुका पोडेल. जी अंध आहे. मात्र, ती आपल्या सुरेल आवाजाने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे.दरम्यान रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) त्यांचा आगामी चित्रपट अ‍ॅनिमलच्या प्रमोशनसाठी सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडॉल सीझन १४ मध्ये आले होते. यादरम्यान स्पर्धक रेणुकाच्या आवाजाचे रणबीर आणि रश्मिका चाहते झाले.

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना 'इंडियन आयडॉल सीझन १४' मध्ये 'अ‍ॅनिमल'च्या प्रमोशनसाठी पोहोचले. यादरम्यान स्पर्धक रेणुका पोडेलचे गाणे ऐकून अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्यासह सर्व जज भावूक झाले. शोच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये रेणुकाने रणबीर आणि दीपिका पदुकोणच्या 'तमाशा' चित्रपटातील 'अगर तुम साथ हो' हे गाणे गायल्याचे पाहायला मिळाले. रश्मिका आणि रणबीर रेणुकाच्या मधुर आवाजात पूर्णपणे हरवून गेले आणि थोडेसे भावूक झाले. इतकंच नाही तर रणबीर कपूर स्टेजवर आला आणि स्पर्धकाच्या पायाला स्पर्श करत म्हणाला की श्रेया घोषाल देवी नंबर वन आणि रेणुका देवी नंबर दोन आहे.

रेणुकाने रणबीर कपूरला त्यांची मुलगी राहाबाबतही प्रश्न विचारला. रेणुका म्हणाली, “मी ऐकलं की तू खूप गोंडस आहेस आणि तुझ्यासारखीच तुझी मुलगी राहाही खूप गोंडस आहे.” हे ऐकून रणबीर हसायला लागला. यानंतर रेणुकाने रणबीरला विचारले की राहासोबत वेळ घालवताना तो कोणते गाणे गातो.
रणबीरने सांगितले की तो राहासोबत दोन गाणी गातो. 'बेबी शार्क' हे एक इंग्रजी गाणे आहे, जे खूप चीड आणणारे आहे, पण त्याला ते खूप आवडते. दुसरे गाणे म्हणजे 'लल्ला लल्ला लोरी दूध की कटोरी'. श्रेया घोषाल म्हणाली की, रणबीरच्या तोंडून हे ऐकून तिला आश्चर्य वाटतं, पण मुलांच्या आगमनाने त्याच्या प्लेलिस्टमध्ये बदल होतात हे तिला माहीत आहे.

Web Title: Ranbir Kapoor got emotional on the stage of Indian Idol 14, fell on the contestant's feet, the video is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.