रणबीर कपूरने आपल्या लेडी लव्हला बर्थ डेला दिले 'हे' रोमॅँटिक गिफ्ट, वाचून तुम्ही म्हणाला 'वॉव'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 15:39 IST2019-03-16T15:30:18+5:302019-03-16T15:39:48+5:30
आलिया भट नुकताच (काल) 26वा वाढदिवस साजरा केला आहे. आलियाला बर्थ डे विश करण्यासाठी बॉयफ्रेंड रणबीर कपूर रात्रीच तिच्या घरी पोहोचला होता.

रणबीर कपूरने आपल्या लेडी लव्हला बर्थ डेला दिले 'हे' रोमॅँटिक गिफ्ट, वाचून तुम्ही म्हणाला 'वॉव'
आलिया भट नुकताच (काल) 26वा वाढदिवस साजरा केला आहे. आलियाला बर्थ डे विश करण्यासाठी बॉयफ्रेंड रणबीर कपूर रात्रीच तिच्या घरी पोहोचला होता. त्यानंतर तिकडे जवळच्या मित्रापरिवारासोबत केक कट करुन आलियाचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यात आला.
रिपोर्टनुसार रणबीरने आलियासाठी जे गिफ्ट प्लॉन केले आहे ते सुपर रोमँटिक आहे. मिळालेल्या माहितीनुसार रणबीरने आलियासोबत यूएसच्या कॉलोराडोमधल्या ऐसपेन माऊंटनला ट्रिप प्लॉन केली आहे. तिथे जाऊन हे कपल क्वॉलिटी टाईम स्पेंट करणार आहेत. कलंकच्या प्रमोशनमधून आलिया फ्री झाली की आलिया आणि रणबीर ट्रिपवर जाणार आहेत. जर रणबीरने आलियाला खरंच ट्रिप गिफ्ट दिली असेल तर याहुन परफेक्ट गिफ्ट काहीच असू शकत नाही. कारण दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून कामात बिझी आहेत. त्यामुळे एकमेकांसोबत वेळ स्पेंट करण्याची कमी संधी मिळतं आहे.
आलिया आणि रणबीर 'ब्रह्मास्त्र'मध्ये एकत्र दिसणार आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे. या सिनेमातून आलिया रणबीर कपूरसोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर रणबीर व आलिया एकमेकांत गुंतले आणि सोनम कपूरच्या लग्नात एकत्र हजेरी लावत, त्यांनी आपले नाते जगजाहीर केले.