आधी दारू आणि नॉनव्हेज सोडलं, आता शिकतोय 'ही' विद्या; 'रामायण'साठी रणबीर करतोय कसून तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 03:48 PM2024-03-26T15:48:28+5:302024-03-26T15:49:02+5:30

आधी दारू आणि नॉनव्हेज सोडलं, आता 'रामायण'साठी रणबीरने उचललं मोठं पाऊल

ranbir kapoor gets trained for archery to play prabhu ram in nitesh tiwari ramayan movie | आधी दारू आणि नॉनव्हेज सोडलं, आता शिकतोय 'ही' विद्या; 'रामायण'साठी रणबीर करतोय कसून तयारी

आधी दारू आणि नॉनव्हेज सोडलं, आता शिकतोय 'ही' विद्या; 'रामायण'साठी रणबीर करतोय कसून तयारी

नितेश तिवारींच्या 'रामायण' या आगामी चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी रणबीर कठोर मेहनतही करताना दिसत आहे. 'रामायण' सिनेमासाठी श्रद्धाभाव दाखवत रणबीरने दारू पिणं आणि नॉनव्हेज खाणं सोडलं होतं. त्यानंतर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीर खास ट्रेनिंगही घेत होता. आता या भूमिकेसाठी तो आर्चरी शिकणार आहे. 

'रामायण' सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यापूर्वी नितेश तिवारी कलाकारांकडून तयारी करून घेत आहेत. याआधी रणबीरला व्हॉईस ओव्हर आणि संवादाचं ट्रेनिंग देण्यात येत होतं. आता रणबीरकडून आर्चरीचीही तयारी करून घेतली जात आहे. प्रभू श्री राम हे क्षत्रिय होते. ते उत्तम धनुर्धारी होते. त्यामुळे त्या भूमिकेला पूरेपूर न्याय देण्यासाठी रणबीरही धनुर्विद्येचं प्रशिक्षण घेणार आहे. त्याचं ट्रेनिंगही सुरू असल्याची माहिती मिळत आहे. रामायण सिनेमासाठी रणबीर घेत असलेल्या ट्रेनिंगमधील काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये रणबीर हेडसँड करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बाणांचे फोटो दिसत आहेत. 

तर दुसरीकडे रणबीरही या भूमिकेसाठी कठोर मेहनत घेताना दिसत आहे. भगवान रामाच्या भूमिकेसाठी रणबीर तास न् तास डायलॉगची प्रॅक्टिस करत आहे. दरम्यान, 'रामायण' हा नितेश तिवारींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या सिनेमात रणबीर श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. तर साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, साऊथ सुपरस्टार यश रावणाच्या आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: ranbir kapoor gets trained for archery to play prabhu ram in nitesh tiwari ramayan movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.