​रणबीर कपूरला नकोय ‘बॅड बॉय’ इमेज; हायर करणार पीआर एजन्सी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2017 11:54 IST2017-06-04T06:24:49+5:302017-06-04T11:54:49+5:30

अभिनेता रणबीर कपूर आणि मीडियाचे संबंध फार मधूर नाहीत. रणबीर मीडियाशी भिडल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतातच. अर्थात याचा अर्थ ...

Ranbir Kapoor does not want 'bad boy' image; Haier PR agency! | ​रणबीर कपूरला नकोय ‘बॅड बॉय’ इमेज; हायर करणार पीआर एजन्सी!

​रणबीर कपूरला नकोय ‘बॅड बॉय’ इमेज; हायर करणार पीआर एजन्सी!

िनेता रणबीर कपूर आणि मीडियाचे संबंध फार मधूर नाहीत. रणबीर मीडियाशी भिडल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतातच. अर्थात याचा अर्थ रणबीर कपूर चांगली व्यक्ती नाही, असा मुळीच नाही. खरे सांगायचे तर रणबीरचे काम सांभाळणारी कुठलीही पीआर कंपनी नाही. त्यामुळेच अनेकदा रणबीरला स्वत:लाच मीडिया मॅनेज करावा लागतो. शूटींगच्या अनियमित वेळा, ताण अशा सगळयांत चिडचिड होणे साहजिक आहे. मग काय, कदाचित रणबीरची हीच चिडचिड वेळोवेळी व्यक्त होते. आता कायम असाच स्वभाव राहिल्यानंतर ‘बॅड बॉय’ची इमेज बनायला वेळ लागत नाही. सुदैवाने रणबीरला हे वेळीच लक्षात आलेय. होय,  मीडियात आपली इमेज सांभाळण्यासाठी म्हणूनच रणबीरने एक पीआर एजन्सी हायर करण्याचे ठरवले आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानाल तर, रणबीरने अनेक पीआर एजन्सीशी संपर्क साधणे सुरु केले आहे. त्यामुळे लवकरच रणबीरचे संपूर्ण काम एखादी पीआर कंपनी सांभाळताना दिसेल. तसेही रणबीर आज बॉलिवूडचा बडा स्टार झालाय. लवकरच त्याने दोन मोठे सिनेमे रिलीज होणार आहे. एक ‘जग्गा जासूस’ आणि दुसरा संजय दत्तचे बायोपिक़ हे दोन्ही सिनेमे बॉक्सआॅफिसवर चालावेत आणि रणबीरच्या कामावर मीडियाचे लक्ष राहावे, यासाठी रणबीरने आपल्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. रणबीरचा हा निर्णय करिअरच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर अगदी योग्यच म्हणायला हवा.

ALSO READ : पुढच्या वर्षी रिलीज होणार संजय दत्तचा बायोपिक

संजय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर संजय दत्तची भूमिका साकारणार आहे. रणबीरशिवाय अभिनेत्री मनीषा कोईराला आणि परेश रावल यात दिसणार आहे. मनीषा कोईराला संजयच्या आईची म्हणजेच नर्गिस दत्तच्या तर परेश रावल सुनील दत्त यांच्या भूमिकेत या चित्रपटात दिसतील.

Web Title: Ranbir Kapoor does not want 'bad boy' image; Haier PR agency!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.