‘संजू’मधील न्यूड सीनबद्दल रणबीर कपूरने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 10:04 IST2018-05-31T04:34:44+5:302018-05-31T10:04:44+5:30
‘संजू’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रत्येकांच्या ओठांवर रणबीर कपूरचे नाव आहे. या चित्रपटातील रणबीरच्या अभिनयाची मुक्तकंठाने प्रशंसा होतेय. हा चित्रपट ...

‘संजू’मधील न्यूड सीनबद्दल रणबीर कपूरने केला खुलासा
‘ ंजू’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रत्येकांच्या ओठांवर रणबीर कपूरचे नाव आहे. या चित्रपटातील रणबीरच्या अभिनयाची मुक्तकंठाने प्रशंसा होतेय. हा चित्रपट सुपरडुपर हिट असणार, इथपर्यंत भाकित वर्तवले जात आहे. अभिनेता संजय दत्त यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा पाचवा चित्रपट आहे. मजेशीर बाब म्हणजे, यापैकी तीन चित्रपटांत खुद्द संजय दत्तने काम केले आहे आणि आता पाचवा चित्रपट संजयच्याच आयुष्यावर बेतलेला आहे. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आज रिलीज झालेला ‘संजू’चा ट्रेलर पाहिला असेल तर तुम्हालाही त्याचा अंदाज येईल.
ट्रेलरमध्ये संजय आयुष्यातील काही गोड क्षण आहेत, तसेच त्याच्या वाट्याला आलेले काही दाहक अनुभवही आहेत. ट्रेलरमधील दोन सीन्स तर अंगावर रोमांच उभे करणारे आहेत. यापैकी एक सीन आहे, तुरुंगातला. तुरुंगाचे शौचालय ओव्हर फ्लो होतेय आणि संजयच्या भूमिकेतील रणबीर जोरजोराने तेथून बाहेर काढण्यासाठी ओरडतो आहे. अन्य एका सीनमध्ये रणबीर न्यूड उभा आहे आणि पोलिस त्याला स्कॅन करताहेत.
![]()
ALSO READ : मैं बेवड़ा हूं, ठरकी हूं... लेकिन टेररिस्ट नहीं! ‘संजू’चा बहुप्रतिक्षीत ट्रेलर रिलीज, पाहून व्हाल खल्लास!!
या सीनमध्ये रणबीरच्या चेह-यावरचे भाव कमालीचे जिवंत आहेत. न्यूड सीन देण्याची जोखिम रणबीरने या चित्रपटात उचलली आहे. यापूर्वी आपल्या डेब्यू चित्रपटात म्हणजेच ‘सावरियां’मध्ये रणबीर अशाच धर्तीचा एक सीन करताना दिसला होता. रणबीरचे मानाल तर त्या एका सीनमुळेच ‘संजू’मधील न्यूड सीन तो सहज करू शकला. ‘संजू’च्या ट्रेलर लॉन्चवेळी रणबीर याबद्दल बोलला. मी माझ्या पहिल्याच चित्रपटात न्यूड झालो होतो. त्यात माझा टॉवेल घसरला होता. खासगी आयुष्यात मी जरासा लाजरा आहे. पण कॅमे-यासमोर असताना स्वत:च्या भावभावनांबद्दल तुम्हाला ‘न्यूड’ व्हावेच लागते, असे रणबीर म्हणाला. ‘संजू’मधील न्यूड सीन देण्याची जोखिम रणबीरने का पत्करली असेल, हे यावरून तुम्हाला कळले असेलच.