Animalसाठी रश्मिका मंदाना नव्हती पहिली पसंती, बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला मिळालेली ऑफर, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:43 PM2023-11-25T12:43:34+5:302023-11-25T12:45:23+5:30

रणबीर कपूरबरोबर 'अ‍ॅनिमल' सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे.

Ranbir Kapoor animal rashmika mandanna parineeti chopra | Animalसाठी रश्मिका मंदाना नव्हती पहिली पसंती, बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला मिळालेली ऑफर, पण...

Animalसाठी रश्मिका मंदाना नव्हती पहिली पसंती, बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला मिळालेली ऑफर, पण...

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना(Rashmika Mandana)चा आगामी चित्रपट 'अ‍ॅनिमल'(Animal Movie)चा ट्रेलर अलिकडेच रिलीज झाला. ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यातील रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या कामाचं सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे. हा सिनेमा १ डिसेंबरला रिलीज होणार आहे. रणबीर कपूरबरोबर 'अ‍ॅनिमल' सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील त्यांचं रोमँटिक गाणंही व्हायरल झालं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का या सिनेमासाठी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांची यासिनेमासाठी रश्मिका पहिली पसंती नव्हती. 

रश्मिकाच्या आधी निर्मात्यांनी या चित्रपटासाठी परिणीती चोप्राशी संपर्क साधला होता, असे स्वतः परिणीतीने मीडियाला सांगितले. तिने कबूल केले की ती निर्मात्याची पहिली पसंती होती पण दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या पुढच्या प्रोजेक्ट अमरसिंग चमकिलामुळे तिने 'अ‍ॅनिमल' सोडला. 

'अ‍ॅनिमल' चित्रपटाबद्दल... 
'अ‍ॅनिमल' हा पिता-पुत्राचा बंध दाखवणारा चित्रपट आहे. यात अनिल कपूर आणि रणबीर कपूर बाप लेकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.  हा चित्रपट संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित क्राईम ड्रामा आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: Ranbir Kapoor animal rashmika mandanna parineeti chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.