रणबीर कपूर आणि आलिया भटच्या लग्नाच्या तयारीला लागल्या नीतू कपूर, व्हिडिओ झाला व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 15:57 IST2021-03-24T15:57:04+5:302021-03-24T15:57:57+5:30
रणबीरची आई नीतू सिंग कपूर तर लेकाच्या लग्नासाठी अगदी आतूर झाल्या आहेत. त्यांच्या लग्नाच्या तयारीला देखील त्या लागल्या आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भटच्या लग्नाच्या तयारीला लागल्या नीतू कपूर, व्हिडिओ झाला व्हायरल
आलिया भट आणि रणबीर कपूर हे आता केवळ मित्र नाहीत तर हे नाते कधीच मैत्रीच्या पलीकडे गेले आहे आणि आता अगदी लग्नापर्यंत पोहोचलेय. होय, रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चा कधीच सुरु झाल्या आहेत. रणबीरची आई नीतू सिंग कपूर तर लेकाच्या लग्नासाठी अगदी आतूर झाल्या आहेत. त्यांच्या लग्नाच्या तयारीला देखील त्या लागल्या आहेत.
नीतू सिंग कपूर रणबीर आणि आलियाच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात डान्स करणार असून सध्या त्याची रिहर्सल करत आहेत. त्यांचा रिहर्सलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रणबीर कपूरच्या ये जवानी है दिवानी या चित्रपटातील गाण्यावर त्या राजेंद्र सिंग म्हणजेच मास्टरजी यांच्यासोबत रिहर्सल करताना दिसत आहेत.
रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असली तरी हे लग्न यावर्षी होणार नाहीये. बॉलिवूडलाईफने दिलेल्या वृत्तानुसार रणबीर आणि आलिया यांनी ब्रम्हास्त्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच लग्न करण्याचे ठरवले आहे.
नीतू कपूर यांचा याच गाण्यावर रिहर्सल करतानाचा राजेंद्र सिंग यांच्यासोबतचा व्हिडिओ ऑक्टोबर 2020 मध्ये देखील व्हायरल झाला होता. त्यावेळी देखील ते लवकरच लग्न करतील असा अंदाज नेटिझन्सकडून लावण्यात येत होता.