राणा दग्गुब्बातीने बर्थ डेच्या दिवशी शेअर केलं 'विराटपर्वम'चे जबरदस्त टीझर आणि पोस्टर
By गीतांजली | Updated: December 14, 2020 14:26 IST2020-12-14T13:46:09+5:302020-12-14T14:26:41+5:30
णाने आपल्या चाहत्यांसाठी ‘विराटपर्वम’ या आगामी सिनेमाचा नवीन पोस्टर आणि टीझरही सोशल मीडियावर शेअर केले आहे.

राणा दग्गुब्बातीने बर्थ डेच्या दिवशी शेअर केलं 'विराटपर्वम'चे जबरदस्त टीझर आणि पोस्टर
बाहुबली सिरीजमध्ये भल्लादेवची भूमिका साकारणार तेलुगू स्टार राणा दग्गुबती आज (14 डिसेंबरला) आपला 36वा वाढदिवस साजरा करतो आहे. राणाचे चाहते सोशल मीडियावर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतायेत. याचदरम्यान राणाने आपल्या चाहत्यांसाठी ‘विराटपर्वम’ या आगामी सिनेमाचा नवीन पोस्टर आणि टीझरही सोशल मीडियावर शेअर केले आहे.
या पोस्टरमध्ये राणा दग्गुबातीने यूनिफॉर्म घालून हातात रायफल घेतली आहे. हे पोस्टर शेअर करताना राणाने लिहिले 'ऑलरेडी' आणि सोबत फटाक्यांची इमोजीही लावली आहे. राणाच्या या आगामी सिनेमाचे शूटिंग अंतिम टप्प्यात आहे.
तेलगूमध्ये बनवत असलेल्या या सिनेमात राणासह साई पल्लवी, नंदिता दास आणि प्रियामणि मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन वेणु उडुगुला करत आहेत. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर राणा आतापर्यंत 'बेबी', 'हाऊसफुल 4' आणि 'गाझी अटॅक' मध्ये दिसला आहे. लवकरच राणाचा आगामी सिनेमा 'हाथी मेरे साथी' हिंदी, तेलगू आणि तामिळ भाषांमध्ये रिलीज होणार आहे. कोरोना काळात मिहिका आणि राणाचं हैदराबादमध्ये धुमधडाक्यात लग्न झालं होतं. सोशल मीडियावर त्याचे लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. दोघेही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यांनी कधीच त्यांचे नाते जाहीर केले नव्हते.