​राणा दग्गुबतीला मिळाले हॉलिवूडचे तिकिट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 14:44 IST2017-07-30T09:14:38+5:302017-07-30T14:44:38+5:30

‘बाहुबली’मधून अफाट लोकप्रीयता मिळवणारा अभिनेता राणा दग्गुबती सध्या जोरात आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. गेल्या काही दिवसांपासून ...

Rana Daggubati got Hollywood ticket! | ​राणा दग्गुबतीला मिळाले हॉलिवूडचे तिकिट!

​राणा दग्गुबतीला मिळाले हॉलिवूडचे तिकिट!

ाहुबली’मधून अफाट लोकप्रीयता मिळवणारा अभिनेता राणा दग्गुबती सध्या जोरात आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. गेल्या काही दिवसांपासून एका पाठोपाठ एक असे सरप्राईज देण्याचा धडाका त्याने चालवला आहे. ‘नेने राजू नेने मंत्री’ हा चित्रपट तर आहेच. पण याशिवाय ‘यारी नंबर १’ हा तेलगू शो तो होस्ट करणार आहे. एवढेच नाही तर आता इंटरनॅशनल प्रोजेक्टची तयारीही त्याने चालवली आहे. होय, ऐकता ते खरे आहे.आता केवळ नॅशनल नाही तर इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये आपण राणाला पाहू शकणार आहोत. एका वाक्यात सांगायचे तर, राणा सध्या आपल्या हॉलिवूड प्रवासाची तयारी करतो आहे. ‘बाहुबली’ व ‘बाहुबली2’ मध्ये नकारात्मक भूमिका साकारणाºया राणाला हॉलिवूडचे तिकिट मिळाले आहे. नुकतीच राणाने आपल्या या इंटरनॅशनल प्रोजेक्टची घोषणा केली. 
युकेच्या ‘द लंडन डिजिटल मुव्ही अ‍ॅण्ड टीव्ही स्टुडिओज’ने राणाला आपले एशिअन अ‍ॅम्बिसीडर म्हणून निवडले आहे. यानंतर राणाने या स्टुडिओसोबत एक चित्रपट साईन केला आहे. येत्या वर्षात या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. अर्थात अद्याप या चित्रपटाचे नाव, त्याची स्टारकास्ट याबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही.

ALSO READ :  ​राणा दग्गुबतीसोबत करण जोहरच्या पार्टीत पोहोचला प्रभास!

सध्या राणा दग्गुबती ‘नेने राजू नेने मंत्री’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. तेजाने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एक पॉलिटिकल ड्रामा आहे. यात राजकीय महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या एका व्यक्तीची कथा आहे. राणाच्या अपोझिट काजल अग्रवाल या चित्रपटात दिसणार आहे. यात ती राणाच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसेल. तेलगू, तामिळ आणि मल्याळम अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होतो आहे.

Web Title: Rana Daggubati got Hollywood ticket!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.