'रामलखन' रिमेकमध्ये शाहरुख नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 01:11 IST2016-01-16T01:08:35+5:302016-02-12T01:11:25+5:30
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'चैन्नई एक्सप्रेस' आणि 'दिलवाले' मध्ये शाहरूखला रोहितने घेतले होते. पण, रोहित शेट्टीने शाहरूखला 'रामलखन' च्या रिमेकमध्ये ...

'रामलखन' रिमेकमध्ये शाहरुख नाही
र हित शेट्टी दिग्दर्शित 'चैन्नई एक्सप्रेस' आणि 'दिलवाले' मध्ये शाहरूखला रोहितने घेतले होते. पण, रोहित शेट्टीने शाहरूखला 'रामलखन' च्या रिमेकमध्ये घेतले नाही. निर्माता सध्या त्याचा आगामी प्रोजेक्ट 'रामलखन' वर काम करत आहे. त्याविषयी शाहरूख म्हणतो,' नाही. मला चित्रपटात घेतलेले नाही. पण, मी त्याला ऑल दी बेस्ट देतो. मला वाटतं की, कु टुंबांनी यावं आणि चित्रपट पहावा. सर्वांनी मिळून एन्जॉय केला तरच तो आनंद बराच काळ टिकतो. रामलखनमधील इतर कलाकार कोण असतील ? हे अजून कळायचे आहे. टार्गेटेड ऑडिअन्सपर्यंत चित्रपट पोहोचला की,' चित्रपट बनवल्याचे समाधान मिळते. तसेच कलाकारांना हेच समाधान महत्त्वाचे असते. टार्गेट ऑडिअन्ससाठी चित्रपट बनवण्यात येतात आणि त्यांच्याकडून चित्रपटाचे कौतुक करवून घेतले जाते. '