'रामायण'मध्ये रणबीर नाही तर आशुतोष राणांना होती प्रभू रामच्या भूमिकेची ऑफर, 'या' कारणामुळे दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:32 IST2025-07-29T11:31:06+5:302025-07-29T11:32:07+5:30
रणबीर आधी प्रभू श्री राम या भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणा यांना विचारण्यात आलं होतं. पण, त्यांनी ही भूमिका नाकारली.

'रामायण'मध्ये रणबीर नाही तर आशुतोष राणांना होती प्रभू रामच्या भूमिकेची ऑफर, 'या' कारणामुळे दिला नकार
नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचा पहिला टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्री राम यांची भूमिका साकारणार आहे. रामाच्या भूमिकेतील रणबीरचा लूकही समोर आला होता. पण, रणबीर आधी प्रभू श्री राम या भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणा यांना विचारण्यात आलं होतं. पण, त्यांनी ही भूमिका नाकारली.
आशुतोष राणा यांनी नुकतीच बॉलिवूड बबलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, "मला असं वाटतं की जे तुमच्या नशिबात आहे ते तुमच्यापर्यंत कसंही पोहोचतं. तुम्हाला फक्त धैर्याने प्रतीक्षा करायची असते. प्रतीक्षा आणि धैर्य योग्य वेळी दाखवलं गेलं तर त्याचं योग्य फळही मिळतं. आमचं एक नाटक आहे. त्यात मी रावणाची भूमिका साकारतो. आपण आपल्या मित्रांपेक्षा जास्त शत्रूचा विचार करता. तुम्ही ज्याचा विचार करता त्याच्यासारखे तुम्ही होता".
"जर मी प्रभू श्री रामाची भूमिका साकारत असेन तर मी भगवान राम स्वत:बद्दल तर विचार करणार नाहीत. आणि जर त्यांनी स्वत:चा विचार केला असता तर मी आपण त्यांना राम म्हणालो असतो का?", असंही ते म्हणाले. सध्या आशुतोष राणा हमारे राम या त्यांच्या नाटकामुळे चर्चेत आहेत. या नाटकात ते रावणाच्या भूमिकेत आहेत. पण, चाहत्यांनी त्यांना नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये प्रभू श्री रामाच्या भूमिकेत बघण्याची इच्छा व्यक्त केली होती.