'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीची लेक आहे तिच्या इतकीच सुंदर, नेटकरी म्हणाले - तोच चेहरा..तेच डोळे..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 16:30 IST2022-07-27T16:30:03+5:302022-07-27T16:30:03+5:30
Mandakini: १९८५ साली रिलीज झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' चित्रपटात मंदाकिनी राजीव कपूरसोबत झळकली होती. या चित्रपटातील त्याच्या निरागसतेची आणि सौंदर्यांनं रसिकांना भुरळ घातली होती. आता मंदाकिनीची मुलगी मोठी झाली आहे आणि ती देखील तिच्यासारखी दिसते.

'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीची लेक आहे तिच्या इतकीच सुंदर, नेटकरी म्हणाले - तोच चेहरा..तेच डोळे..
अभिनेत्री मंदाकिनी (Mandakini) १९८५ मध्ये रिलीज झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' (Ram Teri Ganga Maili) या चित्रपटात राजीव कपूरसोबत दिसली होती. या चित्रपटातील तिच्या निरागसतेची आणि सौंदर्याची खूप चर्चा झाली होती. या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार बनली. मात्र, नंतर तिने स्वतःला चित्रपटांपासून दूर केले आणि आता २६ वर्षानंतर मंदाकिनीने पुनरागमन केले आहे आणि सध्या ती खूप चर्चेत आहे.
मंदाकिनीची मुले आता मोठी झाली आहेत. म्युझिक व्हिडिओमध्ये ती आपल्या मुलासोबत आली होती, तर तिची सून बुशरा हीदेखील फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. ती एक निर्माती आहे आणि नेटफ्लिक्ससाठी कंटेट तयार करते. यासोबतच ती तिच्या कामाशी संबंधित अनेक छायाचित्रेही पोस्ट करत असते.
पण आज आम्ही मंदाकिनीच्या मुलीबद्दल सांगणार आहोत. मंदाकिनीची मुलगी आता मोठी झाली असून ती लूकवर पूर्णपणे तिच्या आईवर गेली आहे. तिच्या मुलीचे नाव राब्जे इनाया ठाकूर आहे. राबजेचा फोटो पाहून कोणीही म्हणू शकेल की ती तिच्या आईसारखी हुबेहूब दिसते.
मंदाकिनी राम तेरी गंगा मैली नंतर 'डान्स डान्स', 'लडाई', 'कहां है कानून', 'नाग नागिन', 'प्यार के नाम कुर्बान', 'प्यार करके देखो' अशा अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये दिसले. मंदाकिनी शेवटची १९९६ मध्ये गोविंदा, आदित्य पांचोली आणि नीलम कोठारी यांच्यासोबत ‘जोरदार’ या चित्रपटात दिसली होती.