कपूर घराण्याचा ‘हा’ सदस्य तब्बल २८ वर्षांनंतर करतोय ‘वापसी’!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 11:46 AM2018-10-31T11:46:36+5:302018-10-31T11:47:56+5:30

होय, कपूर घराण्याचा एक सदस्य एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २८ वर्षांनंतर रूपेरी पडद्यावर वापसी करतोय.

ram teri ganga maili actor rajiv kapoor to make hindi film comeback after 28 years with ashutosh gowarikers | कपूर घराण्याचा ‘हा’ सदस्य तब्बल २८ वर्षांनंतर करतोय ‘वापसी’!

कपूर घराण्याचा ‘हा’ सदस्य तब्बल २८ वर्षांनंतर करतोय ‘वापसी’!

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये सध्या एकापेक्षा एक दमदार चित्रपट येत आहेत. वेगळ्या विषयाला वाहिलेल्या, दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटांवर प्रेक्षकांच्याही उड्या पडत आहेत. या चित्रपटांनी अनेक जुन्या कलाकारांना रूपेरी पडद्यावर वापसी करण्याचीही संधी दिली आहे. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यावरून गायब असलेले   कलाकार नव्या दमाने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. आता असाच एक लोकप्रीय अभिनेता कमबॅकच्या तयारीत आहेत. होय, मुंबई मिररच्या ताज्या वृत्तानुसार, कपूर घराण्याचा एक सदस्य एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २८ वर्षांनंतर रूपेरी पडद्यावर वापसी करतोय. या सदस्याचे नाव काय तर राजीव कपूर. होय, राजीव कपूर दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बॅनरखाली बनणाºया चित्रपटात लीड रोल साकारताना दिसणार आहेत.
राजीव कपूर हे भारतीय सिनेमाचे ‘शोमॅन’ राज कपूर यांचे सर्वात लहान चिरंजीव आहेत. राजीव यांनी आपल्या करिअरमध्ये फार चित्रपट केले नाहीत. पण त्यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहे. या चित्रपटात राजीव कपूर लीड रोलमध्ये दिसले होते. राजीव यांचे वडिल राज कपूर यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. १९९० मध्ये आलेला ‘जिम्मेदार’हा चित्रपट राजीव कपूर यांचा अखेरचा चित्रपट होता. यानंतर राजीव यांनी कुठल्याच चित्रपटात अभिनय केला नाही. अर्थात यापश्चात त्यांनी भाऊ रणधीर कपूर सोबत मिळून ‘हिना’ या चित्रपटाची निर्मिती केली. यात ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते.
अभिनय व निर्मितीशिवाय राजीव कपूर यांनी दिग्दर्शनातही आपला हात आजमावला. ‘प्रेमग्रंथ’ नामक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. या चित्रपटातही त्यांचा भाऊ ऋषी कपूर यांनीच मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय माधुरी दीक्षित आणि शम्मी कपूर यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.

Web Title: ram teri ganga maili actor rajiv kapoor to make hindi film comeback after 28 years with ashutosh gowarikers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.