राम गोपाल वर्माने राष्ट्रीय पुरस्कारांच्या विश्वासार्हतेवरच उपस्थित केले प्रश्न!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2017 22:22 IST2017-04-23T16:52:11+5:302017-04-23T22:22:11+5:30
नेहमीच कुठल्या तरी वादग्रस्त विषयावर आपले मत व्यक्त करून वाद ओढवून घेणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आता त्यांचा ...

राम गोपाल वर्माने राष्ट्रीय पुरस्कारांच्या विश्वासार्हतेवरच उपस्थित केले प्रश्न!!
न हमीच कुठल्या तरी वादग्रस्त विषयावर आपले मत व्यक्त करून वाद ओढवून घेणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आता त्यांचा मोर्चा राष्ट्रीय पुरस्काराकडे वळविला आहे. होय, यावर्षी सर्वाधिक घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या विश्वासार्हतेवरच त्यांनी बोट ठेवले आहे. यासाठी त्यांनी अभिनेता आमीर खान याचे उदाहरण दिले असून, पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे.
राम गोपाल वर्मा यांनी रविवारी एक ट्विट करताना लिहिले की, ‘हेच सत्य आहे की, भारतातील सर्वश्रेष्ठ कलाकार आमीर खान राष्ट्रीय पुरस्काराव्यतिरिक्त इतर कुठल्याही पुरस्कार सोहळ्यात सहभागी होत नाही. आमीरने आतापर्यंत अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपट बनविले आहेत. त्याने कधीच राष्ट्रीय अथवा इतर कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा केली नाही.
६४ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात अक्षयकुमार याला त्याच्या ‘रूस्तम’ या चित्रपटासाठी पुरस्कार दिला गेला; मात्र अक्षयला हा पुरस्कार दिल्याने प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण मनोज वाजपेयी (अलीगढ), आमीर खान (दंगल), अमिताभ बच्चन (पिंक) यांना डावलून अक्षयलाच का हा पुरस्कार दिला गेला असे सवाल उपस्थित केले जात आहेत. काहींनी त्याचे समर्थन तर काहींनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. आता यामध्ये अप्रत्यक्षपणे राम गोपाल वर्मा यांचेही नाव जोडले गेले आहे.
या पुरस्कारांच्या निवड समितीवर निर्माते प्रियदर्शन हे होते. त्यांनी होत असलेल्या टीकांना उत्तर देताना म्हटले की, जेव्हा प्रकाश झा ज्युरी होते अन् त्यांनी अजय देवगण याला हा पुरस्कार घोषित केला होता तेव्हा कोणीच यावर बोलले नाही. याव्यतिरिक्त रमेश सिप्पी जेव्हा ज्युरी होते अन् त्यांनी अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार दिला होता, तेव्हाही कोणीच विरोध केला नाही. अक्षयकुमारचे नाव पुढे येताच विरोध का वाढला? तसेच त्यांनी आमीरवरही टीका करताना म्हटले होते की, जर आमीर पुरस्कार स्वीकारण्यासाठी येतच नाही तर त्याला पुरस्कार देण्यात काय फायदा?

Fact that Aamir khan,the greatest film maker of india does not attend any award events including national award speaks about those events— Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 23, 2017 ">http://
}}}}Fact that Aamir khan,the greatest film maker of india does not attend any award events including national award speaks about those events— Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 23, 2017