​‘सरकार ३’च्या शूटिंगचे फोटो राम गोपाल वर्मा यांनी केले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 19:29 IST2016-11-06T19:29:24+5:302016-11-06T19:29:24+5:30

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या आगामी व अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सरकार ३’ या चित्रपटाच्या शूटिंगचे ...

Ram Gopal Varma's photo of 'Government 3' shoots done viral | ​‘सरकार ३’च्या शूटिंगचे फोटो राम गोपाल वर्मा यांनी केले व्हायरल

​‘सरकार ३’च्या शूटिंगचे फोटो राम गोपाल वर्मा यांनी केले व्हायरल

ong>दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या आगामी व अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सरकार ३’ या चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. 

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाहून ‘लवकरच सरकार ३’ ची शूटिंग पूर्ण होणार असल्याचे सांगितले होते. या चित्रपटात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने शूटिंग जलद गतीने करता येते आहे, असे सांगितले होते. आता खुद्द रामगोपाल वर्मा यांनी ट्विटरवर या चित्रपटाच्या शूटिंगचे फ ोटो अपलोड केले आहेत. यामुळे या चित्रपटाच्या शूटिंगचा महत्त्वाचा टप्पा पार केला असावा असे मानले जात आहे. गेल्या महिन्यात अमिताभ यांनी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. 

Trying to tame a lion pic.twitter.com/rUyRWJM8GY— Ram Gopal Varma (@RGVzoomin) November 6, 2016}}}} ">http://

}}}} ">Trying to tame a lion pic.twitter.com/rUyRWJM8GY— Ram Gopal Varma (@RGVzoomin) November 6, 2016


Sarkar of acting preparing for a scene on the set of Sarkar 3 pic.twitter.com/98jsPlL1i0— Ram Gopal Varma (@RGVzoomin) November 6, 2016}}}} ">http://

}}}} ">Sarkar of acting preparing for a scene on the set of Sarkar 3 pic.twitter.com/98jsPlL1i0— Ram Gopal Varma (@RGVzoomin) November 6, 2016

२००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘सरकार’ या चित्रपटाचा २००८ साली ‘सरकार राज’ नावाने सिक्वल प्रदर्शित करण्यात आला होता. हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरले होते. या चित्रपटाच्या दोन्ही भागात अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका होती. ‘सरकार’ चित्रपटाची मालिका राजकारण व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. याच मालिकेत राम गोपाल वर्मा ‘सरकार ३’हा चित्रपट तयार करीत आहे. यामध्ये अमिताभ बच्चनसह मनोज वाजपेयी, जॅकी श्रॉफ, यामी गौतम व रोनित रॉय यांच्या भूमिका आहेत. 

या चित्रपटात अमिताभ एकदम नव्या भूमिकेत दिसणार आहेत. अमित साध याने यात महत्त्वाची भूमिका केली असून, तो अमिताभ यांचा नातू दाखविण्यात आला आहे. रोनित रॉय ‘गोकुल साटम’ या भूमिकेत तर मनोज वाजपेयीची भूमिका अरविंद केजरीवाल यांच्यावर आधारित आहे.  जॅकी श्रॉफ चित्रपटाचे पहिले व्हिलन आहेत. जॅकीला या चित्रपटात सर्वजण सर म्हणून बोलविताना दिसणार आहे. रोहिणी हट्टंगडी यांनीही या चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारली आहे.



Web Title: Ram Gopal Varma's photo of 'Government 3' shoots done viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.