राम चरण आणि Jr NTRच्या RRR चा होणार टेलिव्हिजन प्रीमियर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 06:40 PM2022-10-14T18:40:03+5:302022-10-14T18:40:59+5:30

RRR Movie: 'आरआरआर' चित्रपटात अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमराम भीम (ज्युनिअर एनटीआर) या दोन प्रसिद्ध क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानींची कथा सादर सकरण्यात आली आहे.

Ram Charan and Jr NTR's RRR will have its television premiere | राम चरण आणि Jr NTRच्या RRR चा होणार टेलिव्हिजन प्रीमियर

राम चरण आणि Jr NTRच्या RRR चा होणार टेलिव्हिजन प्रीमियर

googlenewsNext

रामाची तेजस्वी ज्वाला, भीमाची मनाचा थरकाप करणारी गर्जना आणि या दोघांच्या संगमातून निर्माण झालेल्या बंडातून घडलेला इतिहास! येत्या रविवारी, १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता ‘अॅण्ड पिक्चर्स’ वाहिनीवर रामचरण (Ram Charan), ज्युनिअर एनटीआर (Jr. NTR), अजय देवगण (Ajay Devgan) आणि आलिया भट (Alia Bhatt) यांच्या भूमिका असलेल्या ‘आरआरआर’(RRR)चा प्रीमिअर प्रसारित होणार आहे. एस. एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दमदार अॅक्शन प्रसंग, नेत्रांची पारणे फेडणारी भव्य दृष्ये, कधी न पाहिलेले स्टंट प्रसंग, उत्कृष्ट कलाकार आणि जगाचा विसर पाडून मन गुंतवून ठेवणारे कथानक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

तिकिटविक्रीद्वारे महसूल मिळविणारा ‘आरआरआर’ हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा आणि जगात दहाव्या क्रमांकाचा चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे अजय देवगण आणि आलिया भट यांनी दाक्षिणात्य चित्रपट उद्योगात पदार्पण केले आहे, आलिया या चित्रपटातील भूमिकेसाठी मुद्दाम तेलुगू भाषा शिकली होती. या चित्रपटात रामचरणच्या प्रवेशाचा जबरदस्त परिणामकारक प्रसंग हा इतिहासात नोंदला जाईल कारण या एका प्रसंगाच्या चित्रीकरणासाठी टीमला ३२ दिवस लागले होते. 


या चित्रपटात अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमराम भीम (ज्युनिअर एनटीआर) या दोन प्रसिद्ध क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानींची कथा सादर सकरण्यात आली आहे. या दोघांचे संगोपन हे अगदी भिन्न प्रकारे आणि भिन्न सामाजिक पार्श्वभूमीवर झाले असले, तरी दोघांमध्ये एक समान धागा असतो आणि तो म्हणजे देशाचे स्वातंत्र्य. राम आणि भीम हे एकमेकांना भेटण्याचे मार्ग शोधतात आणि त्यांच्यात एक अखंड भ्रातृभाव निर्माण होतो. देशाच्या स्वातंत्र्ययुध्दात उघडपणे सहभागी होण्यापूर्वी या दोघांनी जो काळ अज्ञातवासात व्यतीत केला होता, त्या कालखंडावर हा चित्रपट आधारित आहे.

Web Title: Ram Charan and Jr NTR's RRR will have its television premiere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.