साऊथमधल्या या सुपरस्टारला डेट करतेय अजय देवगणची अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 14:38 IST2020-04-28T14:28:21+5:302020-04-28T14:38:41+5:30
सिनेमांसोबत आपल्या पर्सनल लाईफला घेऊन सुद्धा चर्चेत असते.

साऊथमधल्या या सुपरस्टारला डेट करतेय अजय देवगणची अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ?
साऊथमध्ये आपल्या जलवा दाखवल्यानंतर अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आता बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. 'दे दे प्यार दे' सिनेमात रकुल प्रीत सिंग अजय देवगणसोबत रोमान्स करताना दिसली होती. रकुल सिनेमांसोबत आपल्या पर्सनल लाईफला घेऊन सुद्धा चर्चेत असते. काही महिन्यांपासून रकुल प्रीत 'बाहुबली’फेम भल्लालदेव अर्थात राणा दग्गुबातीला डेट करते आहे.
काही महिन्यांपूर्वी रकुल सोफी चौधरीच्या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला राणाबद्दल विचारण्यात आले. पण आम्ही केवळ चांगले मित्र आहोत. मी फिल्मी करिअर सुरु करण्यापासून तो माझा मित्र आहे. तो माझा शेजारी आहे. शिवाय माझी बेस्ट फ्रेन्ड लक्ष्मी मांचू हिचाही मित्र आहे, असे रकुल म्हणाली. आता काय खरे ते रकुलच जाणो. पण तिच्यावर राणात काहीतरी शिजतेय इतके मात्र नक्की. रकुल गेल्या अनेक वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आहे.
‘यारियां’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती ‘अय्यारी’ या सिनेमात झळकली होती. शेवटची रकुल मरजावाँ सिनेमात दिसली होती. साऊथच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. रकुल पंजाबी असल्याने दक्षिणेत काम करणे तिच्यासाठी सोपे नव्हते. पण सुरुवातीच्या काळात तिने अक्षरशः संवाद तोंडपाठ करायची. पहिला चित्रपट तिने केवळ पॉकेट मनीसाठी केला होता. पण या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर तिला अनेक ऑफर मिळायला लागल्या आणि आता तर तिने दक्षिणेत अनेक चित्रपट केले आहे. आता ती दाक्षिणात्य भाषा देखील शिकत असल्याचे मुलाखती दरम्यान सांगितली.