नको त्या पब्लिसिटीमुळे राखीला मिळाला मोठा ब्रेक, चक्क सलमान खानसह झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 13:02 IST2019-09-07T12:56:39+5:302019-09-07T13:02:08+5:30
राखी सावंतला मिळालेल्या संधीमुळे ती आता आपलं नशीब आजमावताना दिसणार आहे

नको त्या पब्लिसिटीमुळे राखीला मिळाला मोठा ब्रेक, चक्क सलमान खानसह झळकणार
आयटम गर्ल राखी सावंत तिच्या अतरंगी कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती सतत तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत होते. लग्नापासून ते हनीमूनपर्यंत असा सगळ्या गोष्टींवर ती सोशल मीडियावर बिनधास्तपणे शेअर करायची. मात्र तिने लग्न केलेला व्यक्ती कोण होता याविषयी राखीने कोणालाच काही कळु दिले नाही. आश्चर्याची गोष्ट ही आहे की राखीच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना माहिती नाही. मात्र शेवटी राखीचे कारनामे सा-या जगाला माहिती असल्यामुळे तिचे फारसे कोणीही तसे मनावर घेत नाही. मात्र नको त्या गोष्टी करत पब्लिसिटी मिळणारी ड्रामा क्वीन राखीला मात्र एक चांगली संधी मिळाली आहे.
यावेळी तिला साथ देणार आहे तो खुद्द दबंग सलमान खान, होय, लवकरच 'बिग बॉसचा 13' वा सिझन सुरू होणार आहे. यावेळी ओपनिंग शोलाच राखी या शोमध्ये सहभागी होणार आहे. यावेळी ती ‘छप्पन छुरी’ या तिच्या आयटम साँगचे प्रमोशन करण्यासाठी या मंचावर हजेरी लावणार आहे. सलमान समोर आयटम साँग्स करणार या गोष्टीमुळे ती आज मै उपर आसमाँ निचे अशीच तिचा अवस्था झाली आहे. बिग बॉसच्या मंचावर राखी पुन्हा एकदा आग लावणार म्हटल्यावर तिच्या या गाण्यालाही जोरदार पल्बिसिटी मिळणार हे मात्र नक्की. आणि त्यामुळे राखीचे गाडी पुन्हा एकदा रूळावर येणार असेच काहीसे चित्र दिसतंय.
या आयटम साँगच्या लॉन्चवेळी राखीने जाणूबजुन काही गोष्टी केल्याचे सोशल मीडियावर तिचे फोटो पाहून युजर्सने प्रतिक्रीया दिल्या होत्या. यावर राखीने सांगितले की, त्या ड्रेसवर सगळ्यांच्या नजरा असतील, हे मला ठाऊक नव्हते. माझे शरीर यातून दिसेल, याचाही मला अंदाज नव्हता. मला असे काहीही करायचे नव्हते. आता लोक मला दोष देत आहेत. माझ्याबद्दल वाईट बोलत आहेत. मी खूप स्ट्राँग आहे. या गोष्टींचा मला अजीबातच फरक पडत नाही. मला माझी बॉडी दाखवण्यात काहीही इंटरेस्ट नाही. लोक मला समजून घेत नाहीत. आज मी खूप दु:खी आहे, असे तिने म्हटले होते.