राखी सावंत विराट-अनुष्काला देऊ इच्छिते एक स्पेशल गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 21:55 IST2017-12-24T16:25:30+5:302017-12-24T21:55:40+5:30

राखी सावंत कधी काय बोलेल याचा काही नेम नाही. आता तिने विराट-अनुष्काबद्दल एक वक्तव्य केले असून, त्यात तिने त्यांना एक स्पेशल गिफ्ट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Rakhi Sawant wants to give Virat-Anusak a special gift! | राखी सावंत विराट-अनुष्काला देऊ इच्छिते एक स्पेशल गिफ्ट!

राखी सावंत विराट-अनुष्काला देऊ इच्छिते एक स्पेशल गिफ्ट!

टम गर्ल राखी सावंत कधी काय बोलेल हे सांगणे मुश्कील असते. अर्थात तिची ही वायफळ बडबड केवळ प्रसिद्धीसाठी असते हेदेखील तेवढेच खरे आहे. असो, पुन्हा एकदा राखीने असेच काहीतरी वायफळ वक्तव्य करून लोकांचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी तिने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नावरूनच एक विचित्र वक्तव्य केले आहे. तिने म्हटले की, मी ज्या कंडोम ब्रॅण्डला प्रमोट करीत आहे, त्या ब्रॅण्डचे पहिले ग्राहक या दाम्पत्याने बनावे. एवढेच नव्हे तर त्यांनी त्यांचा अनुभवही लोकांशी शेअर करावा. 

काही दिवसांपूर्वीच राखीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करताना तिच्या फेव्हरेट कंडोम फ्लेवरची माहिती दिली होती. या व्हिडीओमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. तसेच कंडोम जाहिरातीच्या प्रसारणावर सरकारने घातलेल्या बॅनवरही राखीने सरकारवर निशाणा साधला होता. दरम्यान, आता राखीने विरुष्काबद्दल वक्तव्य करून पुन्हा एकदा माध्यमांचे लक्ष आपलेकडे केंद्रित केले आहे. राखीने म्हटले की, ‘विराट कोहली आणि अनुष्का शर्मा खूपच प्रेमळ कपल आहे. या दोघांनी आताच त्यांच्या वैवाहिक जीवनात पाऊल ठेवले आहे. मी माझ्या ब्रॅण्डचे कंडोम त्यांना गिफ्ट करू इच्छिते. जेणेकरून ते सुरक्षित राहावेत. तसेच मला असे वाटते की, त्यांनी त्यांचे अनुभव लोकांशी शेअरही करावेत.  
 

पुढे बोलताना राखीने म्हटले की, ‘मला असे वाटते की, मी ज्या ब्रॅण्डला प्रमोट करीत आहे त्या ब्रॅण्डचे कंडोम खूपच स्पेशल आहेत. कारण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोमचे फ्लेवर्स बाजारात उपलब्ध करण्यात आले आहेत. लोकांनी आपली सेक्सुअल लाइफ एन्जॉय करावी, हाच त्यामागील हेतू आहे. दरम्यान, राखीच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला जात आहे. परंतु याचा काही परिणाम होईल ती राखी कसली?

Web Title: Rakhi Sawant wants to give Virat-Anusak a special gift!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.