राखी सावंत सांगतेय फिल्म इंडस्ट्रीत कोणी कोणाचा बलात्कार करत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 16:32 IST2018-04-30T11:02:59+5:302018-04-30T16:32:59+5:30
कास्टिंग काऊचची अनेक प्रकरणे सध्या मीडियात गाजत आहेत. धग या मराठी चित्रपटामुळे उषा जाधव प्रकाशझोतात आली. या चित्रपटासाठी तिला ...
.jpg)
राखी सावंत सांगतेय फिल्म इंडस्ट्रीत कोणी कोणाचा बलात्कार करत नाही
क स्टिंग काऊचची अनेक प्रकरणे सध्या मीडियात गाजत आहेत. धग या मराठी चित्रपटामुळे उषा जाधव प्रकाशझोतात आली. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. उषाने काही हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. तिला देखील कास्टिंग काऊचचा सामना कारावा लागला होता असे तिने नुकतेच म्हटले आहे. आज बॉलिवूड, मराठी, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री समोर येऊन कास्टिंग काऊंचबद्दल बोलत आहेत. बॉलिवूडमध्ये तर कास्टिंग काऊच मोठ्या प्रमाणावर सुरू आहे असेच म्हटले जाते. कास्टिंग काऊचच्या बाबतीत प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. कास्टिंग काऊचविषयी बोलताना त्यांनी यामध्ये मुलींवरही काही गोष्टी अवलंबून असतात असं म्हणत सर्वांचे लक्ष वेधले. ‘काय करायचंय आणि काय नाही हे मुलींच्या हातात असतं. तुमच्याकडे कला आहे तर मग स्वत:ला दुसऱ्यांच्या स्वाधीन का करता, स्वत:ला का विकता’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्या या वक्तव्यातून चित्रपटसृष्टीला दोष देणाऱ्यांवर त्यांनी आगपाखड केल्याचे पाहायला मिळाले. आता त्यांच्यानंतर काहीसे अशाच आशयाचे वक्तव्य राखी सावंतने केले आहे.
राखी सावंतने कास्टिंग काऊचविषयी म्हटले आहे की, मी जेव्हा इंडस्ट्रीत नवीन आली, त्यावेळी मला देखील कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. पण त्यामुळे प्रत्येकच निर्माता अथवा दिग्दर्शक तसाच असतो असे मी म्हणणार नाही. सगळ्या इंडस्ट्रींप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील कास्टिंग काऊच आहे. माझ्यात टायलेंट असल्याने मला कोणत्याही प्रकारची तडजोड करावी लागली नाही. मी सगळ्या नवोदितांना एवढेच सांगेन की, संयम राखा, तुम्हाला कोणाच्याही स्वाधीन करू नका... फिल्म इंडस्ट्रीत कोणीच कोणाचा बलात्कार करत नाही. त्यामुळे सरोजजी यांच्या वक्तव्याला माझे संपूर्णपणे समर्थन आहे. बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच अस्तित्वात असूनही कोणीही त्याबद्दल बोलत नाही. पण त्यांनी याबद्दल वक्तव्य केले हेच खूप महत्त्वाचे आहे. मुलीदेखील आपले करियर लवकर सेटल होण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार असतात. काहीही करा... पण मला काम द्या अशा बोलणाऱ्या किती मुली बॉलिवूडमध्ये येताना दिसतात असे वक्तव्य राखीने नुकतेच केले आहे.
Also Read : राखी सावंतला वादग्रस्त वक्तव्य भोवले; सर्वांसमोर मागावी लागली माफी!