Rakhi Sawant : Video - नटली, नाचली, भावूक झाली; आदिलपासून तलाक घेताच राखीने 'असा' साजरा केला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 17:25 IST2023-06-20T17:11:39+5:302023-06-20T17:25:25+5:30
Rakhi Sawant : राखी सावंत नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपासून तिला नवीन लाईफ पार्टनर मिळाल्याच्या बातम्या येत होत्या. यात दरम्यान आता अभिनेत्रीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.

Rakhi Sawant : Video - नटली, नाचली, भावूक झाली; आदिलपासून तलाक घेताच राखीने 'असा' साजरा केला आनंद
राखी सावंत नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपासून तिला नवीन लाईफ पार्टनर मिळाल्याच्या बातम्या येत होत्या. यात दरम्यान आता अभिनेत्रीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती पती आदिलपासून तलाक घेतल्याच्या आनंदात ढोल-ताशांच्या तालावर जोरदार नाचताना दिसत आहे. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
राखी व्हिडीओमध्ये नववधू प्रमाणे नटल्याचं पाहायला मिळत आहे. ती जबरदस्त डान्स देखील करते आणि त्यानंतर भावूक होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक प्रतिक्रिया देत आहेत. राखी सावंत नुकतीच मुंबईत परतली आणि तिने तिचं नवीन प्रेम लकी सिंहबद्दलही सर्वांना सांगितलं. यानंतर पापाराझीने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती लाल रंगाच्या लेहेंगामध्ये डान्स करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये राखी म्हणते, "हा, फायनली माझा डिवोर्स होत आहे आणि ही माझी ब्रेकअप पार्टी आहे. लोक दु:खी होतात पण मी आनंदी आहे. चला सुरुवात करूया!" यानंतर राखी डोक्यावर दुपट्टा घेऊन ढोलाताशाच्या तालावर नाचताना दिसत आहे. राखी सावंतने काही महिन्यांपूर्वी आदिल दुर्राणीसोबत निकाह केला होता. त्यांच्या निकाहाचे काही फोटो देखील व्हायरल झाले होते.
आदिल राखीला भेटण्यासाठी मराठी बिग बॉसच्या सीझन फोर मध्ये देखील आला होता. मात्र त्यानंतर दोघांमधील मतभेदाच्या बातम्याही समोर आल्या होत्या. एवढेच नाही तर अभिनेत्रीने तिच्या पतीवर फसवणुकीचा आरोपही केला होता. यासाठी आदिलला जेलमध्ये देखील जावं लागलं. राखीने आदिलपासून तिच्या जीवाला धोका असल्याचं देखील म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.