‘स्पोर्ट्स आधारित बायोपिकमध्ये काम करायला आवडेल’- रजनीश दुग्गल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 19:26 IST2017-05-23T13:52:23+5:302017-05-23T19:26:43+5:30

अबोली कुलकर्णी  ‘आरंभ’ या आगामी हिंदी मालिकेतून अभिनेता रजनीश दुग्गल हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘१९२०’,‘एक पहेली लीला’,‘वजह ...

Rajnish Duggal would like to work in a sports based biopic | ‘स्पोर्ट्स आधारित बायोपिकमध्ये काम करायला आवडेल’- रजनीश दुग्गल

‘स्पोर्ट्स आधारित बायोपिकमध्ये काम करायला आवडेल’- रजनीश दुग्गल

ong>अबोली कुलकर्णी 

‘आरंभ’ या आगामी हिंदी मालिकेतून अभिनेता रजनीश दुग्गल हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘१९२०’,‘एक पहेली लीला’,‘वजह तुम हो’ यासारख्या अनेक अ‍ॅक्शन-थ्रिलरपटांत अभिनय साकारलेला रजनीश आता ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या एका मालिकेत दिसणार आहे. यानिमित्ताने त्याच्यासोबत केलेला हा दिलखुलास संवाद....

* ‘आरंभ’ या मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
- ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या मालिकेत ‘आर्यन’ आणि ‘द्रविड’ या दोन संस्कृतीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. मालिकेत मी वरूण देव अशी भूमिका साकारत आहे. पॉलिटिक्स, ड्रामा, रोमान्स यांचा संगम असलेल्या या मालिकेत माझी व्यक्तिरेखा ही त्याच्या ध्येयासाठी झगडताना दिसते. वडिलांचा गमावलेला मानसन्मान परत मिळवण्यासाठी वरूणदेव प्रयत्न करत असतो. आर्यन्सकडे त्यांच्या हक्काचे राज्य नसते. द्रविडांकडून ते राज्य मिळवण्यासाठी लढत असतात. 

* कार्तिका नायरसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
- कार्तिका नायर ही एक चांगली अभिनेत्री आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. मी देखील बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट साकारले आहेत. सध्या तरी मालिकेची शूटिंग सुरू आहे. रोमान्स, अ‍ॅक्शन असल्याने आमच्या दोघांतील केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. 

*  चित्रपट आणि मालिका यांपैकी कोणत्या प्रकारात काम करायला तुला आवडतं?
- खरं सांगायचं तर, मला काम करायला आवडतं. मग ते माध्यम कोणतेही असो. वैयक्तिकरित्या मला थ्रिलर, हॉरर प्रकारच्या चित्रपट, मालिकांमध्ये काम करायला खुप आवडतं. त्यामुळेच मी आरंभ या मालिकेची आॅफरही स्विकारली. 

* ‘मर्डर’ सारख्या चित्रपटाची आॅफर तुला मिळालेली असताना तू ती का नाकारलीस?
- मला जेव्हा ‘मर्डर’ चित्रपटाची आॅफर मिळाली तेव्हा मी केवळ २०वर्षांचा होतो. नुकताच मी ‘मिस्टर इंडिया’चा किताब जिंकला होता. यात असलेल्या इंटिमेट सीन्समुळे मी हा चित्रपट नाकारला नाही तर तेव्हा मला असे वाटले की, हा चित्रपट साकारण्यासाठी मी अजून तयार नाही. त्यामुळे मी अत्यंत शांतपणे निर्मात्यांना माझा नकार कळवला. 

* कुणावर आधारित बायोपिकमध्ये काम करायला तुला आवडेल?
- सध्या तरी मी या मालिकेवर लक्षकेंद्रित केले आहे. पण, नक्कीच मला जर संधी मिळाली तर मी एखाद्या स्पोर्ट्स  पर्सनॅलिटी किंवा आर्मी पर्सनॅलिटीवर आधारित बायोपिकमध्ये काम करेन.

* तुझा ड्रीम रोल काय आहे?
- अगदीच असं काही नाही. कारण, मी मला मिळणारी प्रत्येक व्यक्तिरेखा चांगल्याप्रकारे करण्याचा प्रयत्न करतो. पण, तरीही ‘भाग मिल्खा भाग’, ‘रॉक आॅन’ यासारखे चित्रपट किंवा जुन्या काळातील ‘दिवार’, ‘शोले’ यासारख्या चित्रपटातील भूमिका माझ्या ड्रीम रोल आहेत.

* रिअ‍ॅलिटी शोविषयी तुला काय वाटते?
- मी जेव्हा टीव्ही पाहतो तेव्हा जास्त प्रमाणात रिअ‍ॅलिटी शोजच पाहतो. कारण त्यात अ‍ॅक्शन, थ्रिल सगळेच असते. अशा शोजमधून आपल्यामध्ये एक उत्साह संचारतो. त्यामुळे इतर काही शोज पाहण्यापेक्षा मी असे शोजच पाहतो.

* बॉलिवूडमधील कोणत्या कलाकारासोबत काम करण्याचे तुझे स्वप्न आहे?
- नक्कीच. मला अमिताभ बच्चन सर यांच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल. त्याचबरोबर मला अभिनेत्यांपेक्षा चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करायला जास्त आवडेल. अशा दिग्दर्शक ांची यादी खुप मोठी आहे. पण, नक्कीच त्या सगळ्यांसोबत मी लवकरच काम करीन. 

Web Title: Rajnish Duggal would like to work in a sports based biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.