मुलीच्या गेटअपमधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 16:12 IST2020-01-02T16:09:50+5:302020-01-02T16:12:17+5:30
बॉलिवूडच्या या अभिनेत्याला मुलीच्या गेटअपमध्ये ओळखणं कठीण झालं आहे.

मुलीच्या गेटअपमधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव नेहमीच त्याच्या चाहत्यांसाठी काहीतरी नवीन हटके घेऊन येत असतो. जजमेंटल है क्या नंतर राजकुमार राव लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. त्याने त्याच्या आगामी चित्रपटातील पहिला लूक शेअर केला आहे. या चित्रपटात राजकुमार एका मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. मुलीच्या गेटअपमधील राजकुमारला ओळखणंही कठीण जात आहे. या चित्रपटाचं नाव लुडो असून अनुराग बासूनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
राजकुमार रावने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लुडो चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. ज्यात तो मुलीच्या गेटअपमध्ये खूप वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे.
यात त्याने हिरवा लेहंगा परिधान केला आहे. मोकळ्या लांब केसांचा विग लावला आहे. यावरुन अंदाज लावला जाऊ शकतो की त्यानं हा गेटअप कोणत्यातरी नाटकासाठी केला असावा. तर दुसरीकडे तो एका अतिशय अतरंगी मुलाच्या लुकमध्ये दिसतो आहे. त्याचा हा लुक रेट्रो आहे. ८० च्या दशकातील हेअरस्टाइलमध्ये तो एखाद्या जुन्या अभिनेत्याप्रमाणे दिसतो आहे.
राजकुमार या लूकमध्ये एका बाइकवर बसलेला दिसतो आहे तर त्या बाइकवर मिथुन चक्रवर्ती यांचा कोई शक हा डायलॉग सुद्धा लिहिलेला पहायला मिळतो आहे.
या चित्रपटात राजकुमारसोबत दंगल फेम अभिनेत्री फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत दिसणार आहे.