सुशांतच्या निधनानंतरही राजकुमार राव अशी जपतोय मैत्री, मित्राची ही जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 13:45 IST2020-06-26T13:38:45+5:302020-06-26T13:45:00+5:30
सुशांतचे शेवटचा सिनेमा दिल बेचारा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करणार आहे.

सुशांतच्या निधनानंतरही राजकुमार राव अशी जपतोय मैत्री, मित्राची ही जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावर
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबियांना व चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. सुशांतचे शेवटचा सिनेमा दिल बेचारा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करणार आहे. डिज्नी हॉटस्टारवर दिल बेचारा हा चित्रपट 24 जुलैला रिलीज केला जाणार आहे. सुशांतने या जगाचा निरोप घेतल्यानंतर त्याचा हा शेवटच्या सिनेमाचे प्रमोशन करण्याची जबाबदारी अभिनेता राजकुमार रावने घेतली आहे. राजकुमार रावने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. राजकुमार रावने 'काय पो छे' आणि राब्तामध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत काम केले होते.
सुशांत सिंग राजपूतचा दिल बेचारा हा चित्रपट हॉलिवूडपट द फॉल्ट इन अवर स्टार्सचा रिमेक आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्राने केले आहे. विशेष बाब म्हणजे मुकेश छाब्रानेच सुशांतला काय पोछे चित्रपटात हिरो म्हणून कास्ट केले होते.
दिल बेचारा सिनेमा यावर्षी मे मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आणि आता हा चित्रपट डिज्नी हॉटस्टारवर रिलीज करणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान छोट्याशा भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाला ए.आर रेहमानने संगीत दिले आहे आणि यातील गाणी अमिताभ भट्टाचार्यने लिहिले आहेत.