प्रेग्नेंट पत्नीची राजकुमार राव घेतोय अशी काळजी, पत्रलेखाने केला खुलासा, म्हणाली - "तो एक चांगला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 10:51 IST2025-07-12T10:50:48+5:302025-07-12T10:51:16+5:30
Rajkumar Rao And Patralekha: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव पहिल्यांदाच वडील होणार आहे. अलिकडेच त्याने आणि त्याची पत्नी अभिनेत्री पत्रलेखा यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली.

प्रेग्नेंट पत्नीची राजकुमार राव घेतोय अशी काळजी, पत्रलेखाने केला खुलासा, म्हणाली - "तो एक चांगला..."
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) पहिल्यांदाच वडील होणार आहे. अलिकडेच त्याने आणि त्याची पत्नी अभिनेत्री पत्रलेखा (Patralekha) यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली. आता पत्रलेखाने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल सांगितले आहे. तिने सांगितले की, राजकुमार राव या काळात तिची विशेष काळजी घेत आहेत. पत्रलेखाने आई झाल्यानंतर तिच्या बाळासोबतच्या पहिल्या प्रवासाचा खुलासाही केला.
पत्रलेखाने अलीकडेच हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती राजकुमार रावसोबत न्यूझीलंडला गेली होती. तिथे तिला जाणवलं की हा अभिनेता एक उत्तम वडील बनेल. पत्रलेखा म्हणाली की, 'प्रत्येक प्रवास आमच्यासाठी एक नवीन दारे उघडतो आहे आणि आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतो आहे. न्यूझीलंडमध्ये मला वाटले की राज एक उत्तम वडील ठरेल.'
'तो एक उत्तम जोडीदार आहे आणि हे...'
राजकुमार राव पत्रलेखाची कशी काळजी घेतो, याबद्दल अभिनेत्री म्हणाली की, ''तो माझी खूप काळजी घेतो आहे. खरंतर, मला कोणता पदार्थ आवडतो हे ठरवण्याचा त्याने पूर्ण प्रयत्न केला. तो एक उत्तम जोडीदार आहे आणि या प्रवासादरम्यान हे आणखी सिद्ध झाले आहे. आम्ही विचार करत आहोत की बाळ आल्यानंतर न्यूझीलंडच्या दक्षिण भागात फिरायला जाऊयात. कारण आम्ही तिथे जाण्याचा विचार केला नव्हता. आता ते आमच्या बकेट लिस्टमध्ये आहे. कदाचित आपण बाळासोबत बंजी जंपिंग किंवा इतर काही मजा करू शकतो.''
प्रेग्नेंसीनंतर पत्रलेखा घेणारेय ब्रेक
पत्रलेखाने यावेळी सांगितले की, ''मी पुढील ६-७ महिने शूटिंग करणार नाही. मी फक्त घरीच राहीन.'' पत्रलेखा शेवटची 'फुले' चित्रपटात दिसली होती. आता ती नेटफ्लिक्सवरील एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे, ज्याचा खुलासा तिने स्वतः केला आहे.