​रजनीकांतच्या ‘2.0’चा फर्स्ट लुक अक्षयने केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2016 08:58 PM2016-11-16T20:58:32+5:302016-11-16T21:01:55+5:30

दाक्षिणात्या सुपरस्टार रजनीकांत व बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांचा आगामी ‘2.0’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले आहे. ...

Rajinikanth's '2.0' first look was done by Akshay | ​रजनीकांतच्या ‘2.0’चा फर्स्ट लुक अक्षयने केला शेअर

​रजनीकांतच्या ‘2.0’चा फर्स्ट लुक अक्षयने केला शेअर

googlenewsNext
ong>दाक्षिणात्या सुपरस्टार रजनीकांत व बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांचा आगामी ‘2.0’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले आहे. अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याचा पहिला फोटो शेअर केला आहे. 

रजनीकांतची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट रोबोट या चित्रपटाचा सिक्वल असल्याचे सांगण्यात येत आहे. अक्षयने शेअर केलेल्या फोटोमध्ये या चित्रपटाचे नाव मोठ्या अक्षरात लिहले असून त्याखाली अक्षयचा फोटो दिसतो आहे. या चित्रपटात रजनीकांत तिहेरी भूमिकेत दिसणार असून तो शास्त्रज्ञ वसीकरण, रोबोट चिट्टी व नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. यात अक्षयची भूमिका देखील नकारात्मक असून त्याचा गेटअप कावळ्या सारखा असेल असे सांगण्यात येते. 

2.0 या चित्रपटाचा फर्स्ट लूक 20 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या यशराज स्टुडीओमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी करण जोहरवर सोपविण्यात आली आहे. एस.शंकर निर्मित 2.0 हा आतापर्यंतचा बिग बजेट चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे बजेट 350 कोटीहून अधिक आहे. रजनीकांत आणि अक्षय यांच्यासोबतच चित्रपटात अ‍ॅमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसैन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. संगीतकार ए.आर.रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.

या चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे लाईव्ह प्रक्षेपण यू-ट्युब चॅनलवरून होणार आहे. याशिवाय स्मार्टफोन वापरकर्त्यांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता यावा यासाठी चित्रपटाचे खास मोबाईल अ‍ॅपही तयार करण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. अक्षय कुमार व ए.आर. रहेमानवर चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 
 

Web Title: Rajinikanth's '2.0' first look was done by Akshay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.