रजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 20:29 IST2018-09-25T20:27:54+5:302018-09-25T20:29:08+5:30
रजनीकांत सध्या लखनौ ‘पेट्टा’चे शूटींग करत आहेत. पण नबावांच्या या शहरात रजनीकांत यांना वेगळ्याच अनुभवाला सामोरे जावे लागले़.

रजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम!!
सुपरस्टार रजनीकांत सध्या दिग्दर्शक कार्तिक सुब्बाराज यांच्या ‘पेट्टा’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहेत. या चित्रपटाबद्दल फार तपशील बाहेर आलेला नाही. पण या चित्रपटात रजनीकांतचा अॅक्शन आणि रोचक अॅक्शन अवतार दिसणार, इतके मात्र नक्की आहे. अलीकडे रिलीज करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या मोशन पिक्चरमध्ये याची झलक दिसली. रजनीकांत सध्या लखनौ ‘पेट्टा’चे शूटींग करत आहेत. पण नबावांच्या या शहरात रजनीकांत यांना वेगळ्याच अनुभवाला सामोरे जावे लागले. होय, रजनीकांतचे शूटींग पाहण्यासाठी लोकांनी इतकी गर्दी केली की, या गर्दीतून रजनीकांत यांना सुरक्षित बाहेर काढताना प्रशासन आणि त्यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांना चांगलाच घाम फुटला. याचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
दक्षिण भारतातचं नाही तर दक्षिण भारतातही रजनीकांत यांचे चाहते कमी नाहीत. कदाचित रजनीकांत असे एकमेव सुपरस्टार आहेत, ज्यांचे चाहते भारतात सर्वत्र आहेत. ‘पेट्टा’ या चित्रपटात रजनीकांत यांच्या अपोझिट अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार आहे. तो यात निगेटीव्ह भूमिकेत आहे. यापूर्वी ‘काला’ या चित्रपटातही रजनीकांत यांच्या अपोझिट बॉलिवूड स्टार नाना पाटेकर निगेटीव्ह भूमिकेत दिसला होता. याचवर्षी ७ जूनला रजनीकांत यांचा ‘काला’ रिलीज झाला होता. यानंतर उण्यापु-या सहा महिन्यांत रजनीकांत यांचा ‘2.0’ हा दुसरा चित्रपट रिलीज होणार आहे. म्हणजे एकाच वर्षात रजनीकांत यांचे दोन लाईव्ह अॅक्शन चित्रपट रिलीज होतील. हा योग तब्बल २३ वर्षांनंतर जुळून आला आहे. यापूर्वी १९९५ साली रजनीकांत यांचे ‘भाषा’ आणि ‘मुथु’ असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यानंतर यंदा त्यांचे एकापाठोपाठ एक असे दोन चित्रपट पे्रक्षकांना पाहता येणार आहेत. साहजिकच रजनींच्या चाहत्यांसाठी ही डबल ट्रिट असणार आहे.