रिलीज आधीच रजनीकांत - अक्षयच्या चित्रपटाने पार केला 100 कोटींचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 22:04 IST2017-08-12T10:37:24+5:302017-08-15T22:04:08+5:30
रजनीकांत आणि अक्षय कुमार चित्रपट '२.०' ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट दिवाळीला सर्वांच्या भेटीला येणार होता ...

रिलीज आधीच रजनीकांत - अक्षयच्या चित्रपटाने पार केला 100 कोटींचा टप्पा
र नीकांत आणि अक्षय कुमार चित्रपट '२.०' ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट दिवाळीला सर्वांच्या भेटीला येणार होता पण अनिमेशनच्या कामात लागलेल्या जास्तीच्या वेळामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. पण या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे '2.0'ने रिलीज पूर्वीच 110 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे मालकी हक्क झी नेटवर्कने खरेदी केले आहेत.
हा चित्रपट बॉलिवूडमधला सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाचे बजेट एकूण 400 कोटींचे असून यात अक्षयकुमार बॅड बॉय ची तर राजनीकांत हिरोच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचे डिस्टीब्युशन राइट्स तेलंगणा आणि आंध्रप्रदेशचे द ग्लोबल सिनेमा यांनी घेतले आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनवर जवळपास 150 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा हा चित्रपट एकाच वेळी 7000 हजार स्क्रीनवर रिलीज करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळेस 100 फुटांचा बलून उडवण्यात येणार आहे. या बलूनवर राजनीकांत आणि अक्षयचे मोठे पोस्टर असतील. एस. शंकर दिग्दर्शित हा चित्रपट सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे. आता पहायचे हेच आहे की हा चित्रपट 'बाहुबली 2' चे रेकॉर्ड मोडतो की त्याला बरोबर टक्कर देतो की नाही.
याआधी दिवाळी बॉक्स ऑफिसवर '2.0', रोहित शेट्टीचा 'गोलमाल अगेन' आणि आमिर खानचा सीक्रेट सुपरस्टार यांचे घमासान पाहायला मिळाणार होते. मात्र आता '2.0' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्यामुळे अजय देवगण आणि आमिर खान असा सामना पाहायला मिळणार आहे.