​रायमा म्हणते, तर बॉलिवूडमध्ये टिकणे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 10:44 IST2016-02-26T17:44:47+5:302016-02-26T10:44:47+5:30

अभिनेत्री मुनमुन सेन हिची मुलगी आणि सुचित्रा सेन हिची नात रायमा सेन ही बॉलिवूडमधून तशी कधीचीच गायब झालेली आहे. ...

Raima says, it is difficult to stay in Bollywood | ​रायमा म्हणते, तर बॉलिवूडमध्ये टिकणे कठीण

​रायमा म्हणते, तर बॉलिवूडमध्ये टिकणे कठीण

िनेत्री मुनमुन सेन हिची मुलगी आणि सुचित्रा सेन हिची नात रायमा सेन ही बॉलिवूडमधून तशी कधीचीच गायब झालेली आहे. कदाचित त्यामुळेच काही ना काही करून चर्चेत राहण्याचा बॉलिवूडचा फंडा तिनेही स्वीकारल्याचे दिसते. इतक्या वर्षे बॉलिवूडमध्ये राहिल्यानंतर आता तिला नवी उपरती झाली आहे. बॉलिवूडमध्ये कुणी गॉडफादर वा साथ देणारे नसेल तर येथे टिकून राहणे कठीण आहे, असे तिने म्हटले आहे. चांगले काम मिळण्यासाठी येथे अनेक जण स्ट्रगल करीत आहे. माझा परिवार माझ्यासोबत आहे. बंगाली चित्रपटांचा मला आधार आहे, म्हणून अभिनय करते आहे. पण खरे सांगायचे तर बॉलिवूडमध्ये मी अजूनही स्ट्रगल करते आहे. इतक्या वर्षांनंतरही माझा संघर्ष संपलेला नाही. मला मुंबईत काम मिळाले नाही तर मी परत जावू शकते. पण जे कुठल्याही मदतीशिवाय, कुठल्याही गॉडफादरशिवाय आले आहेत, त्यांच्यासाठी हा संघर्ष कित्येकपटीने कठीण आहे, असे रायमा सांगत सुटलीय. आता रायमाला आपल्या या अनुभवातून काय सांगायचे, हे तिचे तीच जाणो.

Web Title: Raima says, it is difficult to stay in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.